6 days ago

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी 15 डिसेंबरला होणार हे जवळपास निश्चित समजलं जात आहे. नागपुरला हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यासाठी संभाव्य मंत्र्यांची नावे समोर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर भाजपच्या संभाव्या मंत्र्यांची यादीही समोर आली आहे. त्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर पक्षातील बड्या नेत्यांना मात्र धक्का दिल्याचे दिसून येत आहे.

Dec 14, 2024 19:46 (IST)

Live Update : उद्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गटनेत्यांची बैठक

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गटनेत्यांची बैठक उद्या सकाळी 11 वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी होणार आहे.

त्यानंतर दुपारी 2 वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येईल.

Dec 14, 2024 19:44 (IST)

Live Update : पुण्याच्या कोंढवा परिसरातील भीषण आगीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्याच्या कोंढवा परिसरातील येवलेवाडी काल दुपारी दीडच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत गंभीररीत्या भाजलेल्या 45 वर्षीय कामगार हरून हमद खान याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 

Dec 14, 2024 19:11 (IST)

Live Update : 10 वर्षे काँग्रेस सत्तेवर असताना बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम केले नाही - पंतप्रधान मोदी

बाबासाहेब आंबेडकरांबद्दल यांच्या मनात प्रचंड द्वेष भरला होता. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना अलीपूर रस्त्यावर एक स्मारक बनविण्याचे ठरले होते. 10 वर्ष काँग्रेस सत्तेवर असताना या स्मारकाचे काम केलेही नाही आणि होऊ देखील दिले नाही. आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही हे स्मारक उभारले. भारतात एकता, अखंडतेसाठी धर्माच्या आधारे आरक्षण दिले जाऊ शकत नाही, गहन चर्चा करून हा निर्णय घेतलेला होता. काँग्रेसने सत्तेच्या सुखासाठी, सत्तेच्या भुकेपोटी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खेळ सुरू केला.

Dec 14, 2024 19:03 (IST)

Live Update : काँग्रेसकडून आरक्षणाला विरोध - पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेसच्या  काळातील पंतप्रधानांनी आरक्षणाला विरोध केला आहे. बाबासाहेबांनी देशाच्या संतुलित समाजासाठी आरक्षण लागू केलं. काँग्रेस गेल्यानंतर ओबीसीला आरक्षण मिळालं. हे काँग्रेसचं पाप आहे. त्याचवेळी ओबीसींना आरक्षण मिळालं असतं तर आज अनेक मोठ्या पदांवर त्या समाजाचे लोक असते. 

Advertisement
Dec 14, 2024 19:00 (IST)

Live Update : 6 दशकात 75 वेळा संविधानात बदल करण्यात आला - पंतप्रधान मोदी

6 दशकात 75 वेळा संविधानात बदल करण्यात आला - पंतप्रधान मोदी 

Dec 14, 2024 18:59 (IST)

Live Update : काँग्रेस सत्तेबाहेर गेल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देणं शक्य झालं - पंतप्रधान मोदी

काँग्रेस सत्तेबाहेर गेल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देणं शक्य झालं - पंतप्रधान मोदी

Advertisement
Dec 14, 2024 18:57 (IST)

Live Update : देशाची एकता हीच आमची प्राथमिकता - पंतप्रधान मोदी

Dec 14, 2024 18:56 (IST)

Live Update : काँग्रेसने निरंतर संविधानाचा अवमान केला. संविधानाचं महत्त्व कमी केलं - पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेसने निरंतर संविधानाचा अवमान केला. संविधानाचं महत्त्व कमी केलं. कलम 35A संसदेत आणल्याशिवाय देशावर लादण्यात आला. ते नसते तर जम्मू कश्मीरमध्ये जी स्थिती निर्माण झाली होती, ती निर्माण झाली नसती. देशाच्या संसदेला अंधारात ठेवून हे करण्यात आले. मनात पाप असल्यानेच त्यांनी असे केले.

Advertisement
Dec 14, 2024 18:54 (IST)

Live Update : शाहबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश पंतप्रधान राजीव गांधी यांनी नाकारला होता - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बेकायदेशीर मार्गाने निवडून आल्याने इंदिरा गांधींची निवड रद्द केली होती, यामुळे राग आल्याने आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी त्यांनी आणीबाणी लागू केली. 1975 साली इंदिरा गांधी 39 वा बदल केला केला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अध्यक्ष यांच्या निवडीविरोधात कोणी कोर्टात जाऊ शकत नाही आणि ते देखील पूर्वलक्षी प्रभावाने असा बदल केला. पंडित नेहरू, इंदिरा गांधींची परंपरा राजीव गांधींनीही पुढे चालू ठेवली. समान न्यायाच्या तत्त्वाला नख लावले. शाहबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश पंतप्रधान राजीव गांधी यांनी नाकारला आणि मतांच्या लांगुलचालनासाठी  संविधानाच्या तत्त्वाचा बळी दिला आणि कट्टरपंथियांपुढे लोटांगण घातले. 

मनमोहन सिंह यांनी म्हटले होते की, मला हे स्वीकारावे लागेल की पक्षाध्यक्ष हे सत्तेचे केंद्र आहे. सरकार पक्षाला उत्तरदायी आहे. इतिहासात पहिल्यांदाच संविधानाला मोठी बाधा निर्माण करण्यात आली. पंतप्रधानांच्या वर गैरसंविधानिक, कोणतीही शपथ न घेतलेले राष्ट्रीय सल्लागार मंडळ पंतप्रधान कार्यालयावर आणून बसवले.



Dec 14, 2024 18:41 (IST)

Live Update : . काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानाचं नुकसान केलंय - पंतप्रधान मोदी

मी तथ्य भारतासमोर ठेऊ इच्छितो.. काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानाचं नुकसान केलं. ७५ वर्षात ५५ वर्षे एकाच कुटुंबाने राज्य केलं. म्हणून देशात काय काय झालं हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. या कुटुंबाचे कुविचार, कुनीती याची परंपरा अद्यापही सुरू आहे. प्रत्येक स्तरावर या कुटुंबाने संविधानाला आव्हान दिलं आहे. १९४७ ते १९५२ या देशात निवडून आलेलं सरकार नव्हतं. एक अस्थायी व्यवस्था होती. निवडणूक झाल्या नाहीत. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था होती. १९५२ पूर्वी राज्यसभेचंही गठण झालं नव्हतं. राज्यातही निवडणुका झाल्या नाहीत. - पंतप्रधान मोदी  

Dec 14, 2024 18:31 (IST)

Live Update : संविधान आणि जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो - पंतप्रधान मोदी

संविधानामुळे माझ्यासारखी अनेक लोकं इथपर्यंत पोहोचू शकलो, कारण आम्हाला कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. संविधान आणि जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. संविधानामुळे आम्हाला एक-दोनवेळा नाही तर तीनवेळा संधी मिळाली.

Dec 14, 2024 18:30 (IST)

Live Update : काँग्रेसच्या माथ्यावरील पाप कधी धुतलं जाणार नाही - पंतप्रधान मोदी

Dec 14, 2024 18:29 (IST)

Live Update : काँग्रेसच्या माथ्यावरील पाप कधी धुतलं जाणार नाही - पंतप्रधान मोदी

काँग्रेसच्या माथ्यावरील पाप कधी धुतलं जाणार नाही - पंतप्रधान मोदी 

Dec 14, 2024 18:28 (IST)

Live Update : इतिहासात पहिल्यांदाच हत्तीवरील अंबारीमध्ये संविधानाला ठेवून गौरव यात्रा काढण्यात आली - पंतप्रधान मोदी

संविधानाला 25 वर्ष पूर्ण होत असताना, देशात संविधानाचे लचके तोडले जात होते. आणीबाणी लागू केली गेली. देशाला तुरुंग बनविण्यात आले, नागरिकांचे अधिकार हिरावून घेतले गेले, माध्यमांची गळचेपी केली गेली. काँग्रेसच्या कपाळावरील हा शिक्का कधीही पुसला जाणार नाही कारण लोकशाहीचा गळचेपी करण्यात आली होती.

देश संविधानाची 50 वर्ष साजरी करत असताना मला संविधानामुळे मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. त्याचवेळी मी ठरवलं होतं की संविधानाची 60 वर्ष साजरी करू. इतिहासात हे पहिल्यांदाच झाले की हत्तीवरील अंबारीमध्ये संविधानाला ठेवून गौरव यात्रा काढण्यात आली होती आणि मुख्यमंत्री हत्तीसोबत रस्त्यावरून पायी चालत होता.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Dec 14, 2024 18:17 (IST)

Live Update : देशाची एकता ही आमची प्राथमिकता आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कलम ३७० देशाच्या एकतेच्या आड येणारे होते. हे कलम एकतेच्या आड येणारे असल्याने हे कलम आम्ही गाडून टाकले.   कारण देशाची एकता ही आमची प्राथमिकता आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Dec 14, 2024 18:16 (IST)

Live Update : भारतातील प्रत्येक क्षेत्रात महिलांचं प्रतिनिधित्व देशाचा गौरव वाढविणारं - पंतप्रधान मोदी

प्रत्येक मोठ्या योजनेच्या केंद्रस्थानी महिला असतात. संविधानाची 75 वर्षे साजरी करीत असताना चांगली बाब म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींच्या जागी एक आदिवासी महिला आहेत. संसदेत महिला खासदारांची संख्या वाढत आहे. आज सामाजिक, राजकीय, शिक्षण, क्रीडा, सर्जनशील क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात महिलांचं प्रतिनिधित्व देशाचा गौरव वाढविणारं आहे. याची सर्वात मोठी प्रेरणा आपलं संविधान आहे. 

Dec 14, 2024 18:12 (IST)

Live Update : विकसित भारताच्या स्वप्नापासून ते सिद्धीसाठी भारताची एकता महत्त्वाची - पंतप्रधान मोदी

आपला देश जलद गतीने विकास करीत आहे. भारत लवकरच जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने मजबूत पाऊल ठेवत आहे. जेव्हा आम्ही स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरा करून तेव्हा देशाला विकसित भारत बनवू हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न आहे. या स्वप्नापासून ते सिद्धीसाठी भारताची एकता महत्त्वाची आहे. आपलं संविधानही भारताच्या एकतेचा आधार आहे. संविधानाच्या निर्मितीत देशातील मोठे दिग्गज, स्वातंत्र्यवीर, सामाजिक कार्यकर्ते, अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समाजातील प्रत्येत वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे होते. 

Dec 14, 2024 18:04 (IST)

Live Update : भारत ही लोकशाहीची जननी - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत ही लोकशाहीची जननी - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताचा जन्म १९४७ मध्ये झाल्याचं संविधान निर्माते मानत नव्हते. मात्र त्यांना भारताच्या महान परंपरेचं भान होतं. भारताची लोकशाही आणि भारताचा प्रजासत्ताक इतिहास जगासाठी प्रेरक राहिला आहे. म्हणूनच भारत मदर ऑफ डेमोक्रसी म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे केवळ विशाल लोकशाही नाही तर  लोकशाहीची जननी आहोत. 

Dec 14, 2024 17:58 (IST)

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतून Live

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतून Live 

Dec 14, 2024 17:45 (IST)

Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेजारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेजारी

एकनाथ शिंदे वर्षावरून मुक्काम हलवणार मुक्तागिरी बंगल्यावर 

मुक्तागिरी बंगला आणि वर्षा बंगला एकमेकांना लागून आहे

सध्या मुक्तागिरी बंगल्याचे रंगरंगोटीचे काम सुरू असून काही दिवसात या बंगल्यावर एकनाथ शिंदे जाणार 

Dec 14, 2024 17:42 (IST)

Live Update : चोरी केलेल्या दुचाकीचा रंग बदलून विक्री करणारे संशयित पोलिसांची ताब्यात

चोरी केलेल्या दुचाकीचा रंग बदलून विक्री करणारे संशयित पोलिसांची ताब्यात

संशयिताकडून 5 लाख 12 हजारांच्या दुचाकी हस्तगत..

नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करून त्यांचा रंग बदलून वाहन विक्री करणाऱ्या संशयितांना वाहन पोलीस पथकाने ताब्यात घेतलं आहे. संशयिताचे नाव सिद्धांत सपकाळे व मोईन अन्सारी असून पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या 9 बाईकसह एकूण पाच लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर संशयित आरोपीवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड करीत आहे..

Dec 14, 2024 17:22 (IST)

Live Update : एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण खातं मिळणार - सूत्र

एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण खातं मिळणार

भाजप शिंदेंना गृहनिर्माण खाते देणार असल्याची सूत्रांची माहिती

Dec 14, 2024 16:29 (IST)

Live Update : हनुमान मंदिर वाद : भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

हनुमान मंदिर वाद : भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

दादरच्या हनुमान मंदिराबाहेर कार्यकर्ते आमने-सामने

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा किरिट सोमय्यांना विरोध

Dec 14, 2024 16:28 (IST)

Live Update : बंदुकीची गोळी लागल्याने महिला पोलीस कर्मचारी जखमी

बंदुकीची गोळी लागल्याने महिला पोलीस कर्मचारी जखमी

पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशन मधील घटना

बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्याने पायाला लागली गोळी.

सदर महिला कर्मचारी पेण येथील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल.

Dec 14, 2024 13:13 (IST)

Ratnagiri Accident News: भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडलं; उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू

रत्नागिरीच्या हातखंभबा इथे भीषण अपघाताची घटना घडली आहे.  मुंबई गोवा महामार्गावर काम करणाऱ्या  इगल इन्फ्रा कंपनीच्या पाण्याच्या डंपरने पाठीमागून दुचाकीस्वाराला धडक दिली. या भीषण अपघातात उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू झाला.  शिशिर रावणंग असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.  तो रत्नागिरीतल्या निवळी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.  तरुणाच्या अपघाती मृत्यूने निवळी गावावर शोककळा पसरली असून  डंपर चालकावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

Dec 14, 2024 13:04 (IST)

Santodh Deshmukh Death Update Beed: सरपंच संतोष देशमुख प्रकरणात केजचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर

सरपंच संतोष देशमुख प्रकरणात केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आली आहे.  अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.  संतोष देशमुख प्रकरणात दुसरी कारवाई झाली असून यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे निलंबन करण्यात आले होते. अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजण्याची शक्यता

Dec 14, 2024 12:06 (IST)

Beed News: वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हा मागे घ्या, समर्थकांचा रास्ता रोको

वाल्मीक कराड यांच्यावर राजकीय द्वेशातून दाखल करण्यात आलेला  गुन्हा मागे घ्यावा यासाठी आता वडवणी बंद पाठोपाठ बीड - कल्याण राष्ट्रीय महामार्गावर डोईठान येथे समर्थकांनी रास्ता रोको केला. वाल्मीक कराड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या विरोधात आता त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेली दिसून येत आहेत. या मागणीसाठी डोईठाण येथे रास्ता रोको करण्यात आलाय. या रस्ता रोको मध्ये शेकडो कराड समर्थक सहभागी झालेत. या रास्ता रोकोमुळे या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. दरम्यान आता वाल्मीक कराड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हे नंतर जिल्ह्यात वातावरण तापू लागले आहे.

Dec 14, 2024 10:39 (IST)

Maharashtra News: राज्यभरातील रेशनिंगचा पुरवठा ठप्प; 7 कोटी नागरिकांना फटका

राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्प झाला असून, याचा फटका 7 कोटी ग्राहकांना बसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 25 तारखेला सर्व रेशन दुकानात रेशन आलेले आहे. मात्र ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याने रेशन पुरवठा करता येत नाहीये. या महिन्यातील आतापर्यंत 5 टक्के रेशन वाटप करण्यात आलं असून, इतर ग्राहकांना अजूनही या महिन्याचा रेशन मिळालेला नाही. रेशन कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणता पंधरा-वीस मिनिटं ते अर्ध्या तासापेक्षाही जास्त वेळ लागत आहे. अजून दोन दिवस अशीच अडचण असणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dec 14, 2024 10:16 (IST)

lalkrishna Advani Heath Update: ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती खालावली; अपोलो रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली असून त्यांना दिल्लीमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत खराब  असल्याचे समोर आलं आहे. एकाच महिन्यात त्यांना चौथ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  प्रकृतीच्या तक्रारीमुळे सध्या ते घरीच असतात. याच वर्षी त्यांना पंतप्रधान मोदी यांनी घरी जाऊन भारतरत्न पुरस्कार प्रदान केला होता. 

Dec 14, 2024 09:20 (IST)

Jalgaon Bus Accident: जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात! 1 ठार, 21 जण जखमी

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव चोपडा रोडवर पिंपळे फाट्याजवळ जळगाव कडून शिरपूरकडे जाणाऱ्या एसटी बसचा उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण ठार तर सुमारे 21 प्रवासी हे जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी मध्ये एसटी चालकाची प्रकृती ही गंभीर असून अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी गाव घेत जखमींना तातडी ते रुग्णालयात हलवले आहे. 

दरम्यान, धरणगाव तालुक्यात कालच दोन गाव जवळ एसटी बस विजेच्या खांबाला धडकून अपघात झाला होता व या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले होते.

Dec 14, 2024 08:31 (IST)

Dhule News: धुळ्यात पुन्हा थंडीचा कहर; आज 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने यंदाच्या हंगामात सपाट भूभागावर प्रथमच शून्य अंशाच्या खाली घसरला आहे. राज्यातही गारठा कायम असून, आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 4.4 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतातील थंडीचा सर्वाधिक परिणाम उत्तर महाराष्ट्रात जाणवत आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात नीचांकी म्हणजे 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिक थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार घेत आहेत. तसेच उबदार कपडे घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे...

Dec 14, 2024 08:28 (IST)

Datta Jayanti 2024: 'दिगंबरा दिगंबरा' च्या अखंड गजरात नृसिंहवाडी दुमदुमली

नृसिंहवाडीतील कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर दत्त दर्शनासाठी भाविकांनी  पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलीय. 'दिगंबरा दिगंबरा'च्या अखंड गजर व श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात नृसिंहवाडी दुमदूमली आहे. बस स्थानकापासून मुख्य दत्त मंदिर महामार्गावर प्रचंड गर्दी आहे. कृष्णा नदीत स्नान करून भाविक दत्त दर्शन घेतायत. दत्त देवस्थानच्या वतीने मंदिराच्या उत्तर बाजूस तीन ठिकाणी दर्शनरांगेचे नियोजन केल्याने भाविकांना दत्त प्रभूंचे दर्शन सोपं झाले आहे. दत्त जयंतीनिमित्त मंदिरात गेली सात दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत. आज मंदिरात पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्री ना’ पंचामृत अभिषेक पूजा होणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार आहे.

Dec 14, 2024 08:25 (IST)

Kumbharli Ghat Traffic: कुंभार्ली घाटात वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

कराड चिपळूण महामार्गावर कुंभार्ली घाटात वाहतूक ठप्प 

कुंभार्ली घाटात एका अवघड वळणावर अवजड वाहतूक करणारा ट्रक बंद पडल्याने वाहतूक झाली ठप्प 

गेल्या दोन तासापासून वाहतूक ठप्प 

घाटात वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

अलोरे -शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल 

वाहतूक सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू

Dec 14, 2024 08:23 (IST)

Nashik News: रेल्वेच्या धडकेत तीन हरणांचा मृत्यू.

रेल्वेच्या धडकेत तीन हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मनमाड जवळच्या वडगाव पंगू शिवारात घडली आहे.पाणी पिण्यासाठी हे हरणे साठवण बंधाऱ्यातून परतत येत असताना संध्याकाळी साडे पाच  वंदे भारत एक्सप्रेसची धडक बसल्याने या हरणांचा मृत्यू झाला ,दरम्यान प्राणी प्रेमींनी माहिती देताच वनविभागाने पंचनामा करून मृत हरणांवर अंत्यसंस्कार केले.

Dec 14, 2024 08:14 (IST)

Ind Vs Aus 3rd test: भारत- ऑस्ट्र्रेलिया कसोटीत पावसाचा खोडा, खेळ थांबवला

भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने व्यत्यय निर्माण केले आहे. खेळ पावसामुळे थांबवण्यात आला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 13 ओव्हरमध्ये बिनबाद 28 धावा इतकी आहे. 

Dec 14, 2024 08:00 (IST)

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, टिटवाळा स्थानकात ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, टिटवाळा येथे वायरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने, लोकलला विद्युत पुरवठा नसल्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही साईट बंद, आसनगाव स्थानकात पॉवर सप्लायबाबत तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

Dec 14, 2024 07:59 (IST)

Central Railway Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे वाहतूक ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

मुंबई लोकलबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवेचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा येथे वायर चा प्रॉब्लेम झाल्यामुळे लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने आहेत. लोकलला विद्युत पुरवठा नसल्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही साईट बंद आहेत. आसनगाव स्थानकात पॉवर सप्लाय बाबत तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुरती खोळंबली आहे.

Dec 14, 2024 07:24 (IST)

तटरक्षक दलाच्या सतर्कतेमुळे जखमी खलाशाचा जीव वाचला

पालघरमधील डहाणूच्या समुद्रात मासेमारी करताना जखमी झालेल्या मच्छीमाराला भारतीय तटरक्षक दलाकडून 10 नोटिकल मैल खोल समुद्रात जाऊन मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. डहाणू तालुक्यातील "राधे कृष्ण" या मासेमारी बोटीत इंजिनमध्ये बिघाड होऊन झालेल्या अपघातानंतर मच्छीमाराच्या मदतीसाठी भारतीय तटरक्षक दल वेळेवर धावलं. त्यामुळे जखमी मच्छीमाराला वेळेत उपचार मिळाल्याने रणजित दामा माळकरी या खलाशालाचा जीव वाचवला आहे. प्रथमोपचारानंतर जखमी खलाशाला डहाणूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Dec 14, 2024 07:23 (IST)

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावाची यादी जवळपास निश्चित, शिंदे-फडणवीसांमध्ये 40 मिनिटे चर्चा

शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 40 मिनिटे चर्चा

दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती

रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांचे एकमत

शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्या संदर्भात चर्चा

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावाची यादी जवळपास निश्चित

उद्या शिंदेंकडूंन नावे जाहीर होण्याची शक्यता