लग्नाच्या दिवशीच संसाराचा The End! सासरी निघालेली नवरी वाटेतच झाली गायब

Parbhani News: लग्नासाठी मुलाच्या बाजूने मुलीला सोन्या-दागिने खरेदीसाठी एकूण 3 लाख 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे 3 तारखेला केरवाडी शिवारातील एका हनुमान मंदिरात हे लग्न संपन्न झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

दिवाकर माने, परभणी

तरुण-तरुणींना लग्नासाठी योग्य जोडीदार मिळणे सध्या अवघड झालं आहे. शहरांकडे वाढत असलेल्या आकर्षणाने गावातील चांगल्या शेती आणि आर्थिक उत्पन्नाच्या मुलांनाही नवरी मिळेनाशी झाली आहे. तर मुलींनाही अनेकदा नापसंती पत्करावी लागते. यामुळे अनेक तरुण-तरुणी लग्न लावून देणाऱ्या एजंटचा सहारा घेत आहेत. मात्र, परभणी जिल्ह्यात याच एजंट्समुळे मोठा घात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील केरवाडी या गावात 3 तारखेला थाटामाटात एक विवाह सोहळा पार पडला होता. परंतु, हा आनंद काही तासांतच संपुष्टात आला.

पुणे येथील एक कुटुंब आपल्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी मध्यस्थीमार्फत पालम तालुक्यात आले होते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर त्याच बैठकीत लग्न निश्चित झाले. लग्नासाठी मुलाच्या बाजूने मुलीला सोन्या-दागिने खरेदीसाठी एकूण 3 लाख 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे 3 तारखेला केरवाडी शिवारातील एका हनुमान मंदिरात हे लग्न संपन्न झाले.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)

नवरी झाली पसार

लग्नानंतर नवरी मुलगी पुण्यासाठी निघाली. नवरा मुलगा नववधूला कारमधून घेऊन जात होता, मात्र त्यांच्या मागे खोटं लग्न लावून देणाऱ्या टोळीतील लोक पाठलाग करत होते. याची कल्पना नवऱ्या मुलाच्या कुटुंबीयांना नव्हती. अंबाजोगाई येथे नवरदेवाने चहासाठी गाडी थांबवली. याच संधीचा फायदा घेऊन नववधू दागिने घेऊन फरार झाली.  नवरीचा सर्वत्र शोध घेतला, पण ती कुठेही भेटली नाही. मात्र, पाठलाग करणाऱ्या गाडीतूनच नवरी पसार झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाच्या कुटुंबीयांनी थेट पालम पोलीस स्टेशन गाठले.

(नक्की वाचा-  क्रिकेटरच्या प्रेमात पडली Bigg Boss ची 'ही' स्पर्धक! पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार?)

पोलिसांची तातडीची कारवाई

हा सर्व प्रकार ऐकून पालम पोलीस निरीक्षक एस. के. खटाने यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखले आणि तातडीने तपास सुरू केला. दोन महिलांना अटक पोलिसांनी तात्काळ हालचाल करत दोन मध्यस्थी महिलांना अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरू असून, याप्रकरणी टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गावखेड्यातील युवक-युवतींच्या लग्नाच्या समस्येचा फायदा घेऊन लोकांना फसवणाऱ्या अशा टोळ्या सक्रिय झाल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article