अमोल गावंडे, प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील बोदवड नाक्यावरील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ 23 मे रोजी मलकापूर शहर पोलिसांनी एका कारची तपासणी करत 1 कोटी 97 लाख 50 हजार रुपयांची रोकड जप्त केल्याची बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रोकड आढळल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी 20 मे रोजी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील धानोरा (विटाळी) पुलाजवळ खामगावहून मलकापूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून 50 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत एकूण 2 कोटी 47 लाख 50 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मलकापूर शहर पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून बोदवड रस्त्यावर कारची तपासणी केली. मलकापूर ते बुलढाणा रोडवर सिल्व्हर रंगाच्या कारची (एमएच एमएच 20 जीव्ही 1781) तपासणी केली. कारमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे दोघेजण होते. त्यांना या पैशांबद्दल विचारलं असता सुरुवातील त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र गाडीतील सीटच्या खाली मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसून आले. शेवटी कार मलकापूर शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आली. त्यानंतर तहसीलदार व नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मलकापूर, महसूल विभाग मलकापूरचे २ शासकीय पंच आणि भारतीय स्टेट बँकच्या कॅश मोजण्याच्या मशीनसह दोन अधिकारी यांचे समक्ष गाडीतील कॅश व्हिडिओ शूटिंगमध्ये मोजण्यात आली. या गाडीत तब्बल १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपये सापडले आहेत. याबाबत आयकर विभाग नागपूर यांना माहिती देऊन जप्त रक्कम जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे जमा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
नक्की वाचा - EXPLAINER : मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? वाचा A to Z माहिती
3 दिवसांपूर्वी 50 लाख जप्त
मलकापूर पोलिसांनी रात्रगस्तीवर असताना एका पांढऱ्या रंगाच्या कार (एमएच 21 बीवाय 101) गाडीला थांबवून तपासणी केली असता, गाडीत 50 लाख रुपयांची रोकड आढळली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप काळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड, एएसआय उल्हास मुके, रविकांत बावस्कर, दीपक नाफडे, संदीप राखोंडे व कन्हाडे यांचे पथकाने केली. सदर प्रकरण आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.