जाहिरात

Buldhana News: ज्याला जीवदान दिलं, त्यानेच जीव घेतला! सापाला वाचवलं, जंगलात गेला, पुढं जे घडलं...

प्राथमिक उपचारानंतरही त्यांचा मार्गातच मृत्यू झाला. ही घटना सर्पमित्रांसाठी इशारा ठरली असून, साप दंशाच्या धोका रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Buldhana News: ज्याला जीवदान दिलं, त्यानेच जीव घेतला!  सापाला वाचवलं, जंगलात गेला, पुढं जे घडलं...

अमोल सराफ, बुलढाणा:

Snake Rescuer Death: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना येथे सापाला जीवदान देण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमावण्याची दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील जनुना ता. खामगाव येथे घडली. स्थानिक सर्पमित्र मंगेश प्रकाश कांबळे (वय ३२) यांना गावात साप पकडून जंगलात सोडण्यासाठी जनुना तलाव परिसरात नेल्यानंतर सापाने दंश केला. प्राथमिक उपचारानंतरही त्यांचा मार्गातच मृत्यू झाला. ही घटना सर्पमित्रांसाठी इशारा ठरली असून, साप दंशाच्या धोका रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

ज्याला जीवदान दिलं त्यानेच जीव घेतला

माहितीनुसार, मंगेश कांबळे हे जनुना गावातील प्रसिद्ध सर्पमित्र म्हणून ओळखले जातात. गावकऱ्यांकडून साप पकडण्याची विनंती येत असल्याने ते नेहमीच तयार राहत. या घटनेच्या दिवशीही गावात साप दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी साप पकडला आणि जंगलात सोडण्यासाठी जनुना तलाव परिसरात गेले. तेथे साप सोडताना अपघाताने सापाने त्यांच्या हाताला दंश केला. दंशानंतर त्यांना तात्काळ खामगाव येथील वस्ती खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Sangli News: सभापती निवडीवरुन अपहरणनाट्य! शिंदे गटाच्या सदस्याला शेतातून पळवलं? मिरजमध्ये हायहोल्टेज ड्रामा

तिथे प्राथमिक उपचार करून अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.मंगेश हे तरुण वयातच सर्पमित्र म्हणून कार्यरत होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेकदा विषारी साप पकडून जंगलात सोडले होते. गावकरी म्हणतात, मंगेश च्या साहसामुळे अनेकांचे प्राण वाचले, पण आज त्यांचाच बळी गेला. स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून,  कुटुंबीयांना देखील योग्य ती  मदत होणे गरजेचे आहे. 

सर्पमित्र आणि सावधगिरी!....

साप हा शब्दच सर्वांनाच थरथर कापायला लावतो. विषारी सापांचा दंश घातक ठरतो. आणि उपचारही वेळेवर मिळणे आवश्यक. सर्पमित्रांसाठी आता विशेष प्रशिक्षण आणि संरक्षण साधनांचा वापर करणे गरजेचे झाले आहे. एंटी-व्हेनम उपलब्ध करून घेणे, दंशानंतर ताबडतोब रुग्णालयात जाणे, योग्य ती दक्षता वापर करणे यासारख्या उपायांनी जीव वाचवता येतील. जनुना गावात ही घटना झाल्याने सर्पमित्रांमध्ये शोककळा पसरली असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जागरूकता मोहिमेची गरज आहे.

Iran israel War: युद्धाचा भडका, अंबड, सातपुर MIDCमधील 1200 उद्योगांना फटका; गॅस तुटवड्याचा परिणाम

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com