जाहिरात

Buldhana News: आणखी एका प्रसिद्ध डॉक्टरचा मृत्यू, रात्री शेतात गेले, सकाळी मृतदेह दिसला; बुलढाण्यात खळबळ

प्राख्यात डॉक्टरांच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक घातपात याविषयी खामगाव ग्रामीण पोलीस चौकशी करत आहेत.

Buldhana News: आणखी एका प्रसिद्ध डॉक्टरचा मृत्यू, रात्री शेतात गेले, सकाळी मृतदेह दिसला; बुलढाण्यात खळबळ

अमोल सराफ, बुलढाणा:

Buldhana Dr Gopal Soni Death: महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्ध डॉक्टरांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. सोलापूरमध्ये प्रसिद्ध सर्जन  डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर यांचा मृत्यू, त्यानंतर नाशिकमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती. अशातच आता बुलढाणा जिल्ह्यातील प्रख्यात डॉक्टर गोपाल सोनी यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

Jejuri Warkari Accident: माऊलींच्या पालखीत आक्रोश! वृद्ध ड्रायव्हर, तापाच्या गोळीने केला घात; कसा घडला अपघात?

डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून एकमेव रक्तपेढी चालवणारे प्रख्यात डॉ.गोपाल सोनी यांचा काल सायंकाळी त्यांच्या शेतात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला यामुळे जिल्हाभरात वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. काल रविवार असल्याने डॉ. गोपाल सोनी हे एकटेच त्यांच्या शेतात गेले होते.

त्यानंतर दीड ते दोन तासानंतर ते मृत अवस्थेत शेतात आढळल्याने हा मृत्यू नेमका कशामुळे झाला..? याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल आहे. डॉ.गोपाल सोनी हे खामगाव शहरातील प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट व सोनी रक्तपेढीचे संचालक होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्णांना चांगली सेवा देत असल्यामुळे जिल्हाभर त्यांचा चांगला परिचय होता.

मात्र त्यांच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान रात्री उशिरा खामगाव पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी सुरू असून अशा प्राख्यात डॉक्टरांच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक घातपात याविषयी खामगाव ग्रामीण पोलीस चौकशी करत आहेत.

Kolhapur News: बाळाच्या बारशाची लगबग; नवरा, सासू-सासरे हॉल पाहायले गेले; आईने संपवलं आयुष्य

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com