जाहिरात

Buldana News: ती मुंबईत कामाला, गावाकडे लग्नाची तयारी, इकडे मात्र तिच्या सोबत भयंकर घडलं, कुटुंबच हादरलं

खुशबू ही मलकापूर शहरातील प्रतिष्ठित समाजसेवक व व्यापारी ताराचंद परयाणी यांचे बंधू दीपक परयाणी यांची मुलगी होती.

Buldana News: ती मुंबईत कामाला, गावाकडे लग्नाची तयारी, इकडे मात्र तिच्या सोबत भयंकर घडलं, कुटुंबच हादरलं
बुलडाणा:

अमोल सराफ

खुशबू दीपक परयाणी ही युवती मुळची बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरची राहाणारी होती. ती मुंबईच चांगल्या ठिकाणी कामाला होती. तिचं फेब्रुवारी महिन्यात लग्न ही होणार होतं. मलकापूरच्या तिच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. आनंदाचं वातावरण होतं. तर इकडे मुंबईत खुशबू आपल्या नव्या आयुष्याची सुंदर स्वप्न पाहात होती. पण त्याच वेळी तिच्या सोबत भयंकर घडलं. संपूर्ण कुटुंबच त्यामुळे कोसळलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. खुशबूची सर्व स्वप्न ही स्वप्नच राहीली. या घटनेनंतर तर सर्वच जण हादरून गेले आहेत. 

खुशबू ही मुंबईत कामाला होती. तिचं वय 27 वर्ष होतं. ती आयसीआयसीआय बँकेच्या मुंबई शाखेत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होती. तिचं कार्यालय वांद्रे कुर्ला कॉम्लॅक्समध्ये होते. नेहमी प्रमाणे खुशबू  कार्यालयात जात होती. त्यावेळी वांद्रे कुर्ला संकुलात असलेल्या एशियन हार्ट हॉस्पिटल जंक्शनजवळ ती उभी होती. त्यावेळी ती रस्ता ओलांडत होती. त्याच वेळी तिला भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की खुशबू क्षणात कोसळली. ती त्यात जबर जखमी झाली.  

नक्की वाचा - Viral News: सुंदर तरुणीने तोकडे कपडे घातल्याचे पाहून ऑटी ड्रायव्हर भडकला, भर रस्त्यात बॉयफ्रेंड समोरच..

6 नोव्हेंबर रोजी ही अपघात झाला. या धडकेत ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिथे असलेल्या तिच्या सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही बातमी समजताच तिच्या ऑफीसमधले सर्व जण हादरून गेले.  विशेष म्हणजे, खुशबूचे लग्न 12 फेब्रुवारी रोजी होणार होते. भावी आयुष्याची सुंदर स्वप्नं रंगवत असतानाच नियतीने तिच्यावर काळाचा घाला घातला. ही बातमी वाऱ्या सारखी मुलकापूरमध्ये येवून धडकली.  या दुर्घटनेने मलकापूर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा - जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत 12 हजार 500 रूपये प्रति किलो, कुठे मिळतो माहित आहे का?

खुशबू ही मलकापूर शहरातील प्रतिष्ठित समाजसेवक व व्यापारी ताराचंद परयाणी यांचे बंधू दीपक परयाणी यांची मुलगी होती. तिच्या निधनाने परयाणी कुटुंबासह परिचित व व्यावसायिक वर्तुळात दुःखाचे सावट पसरले आहे. तिच्या मागे आई-वडील भाऊ आणि काका असा परिवार सोडून ती निघून गेली. या घटनेनं तिचे संपूर्ण कुटूंब हादरून गेले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात दगदग असते. वेळेत कार्यलय कसे गाठायचे असा प्रत्येक जण विचार करत असतो. ऑफीस गाठणे म्हणजे एक प्रकारची लढाईच करायची असले. त्या घाईगडबडीत अनेक गोष्टींचे भान राहात नाहीत. त्यात अनियंत्रीत वाहन चालक यामुळे असे अपघात होतात. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com