Buldhana News: 'माझी बायको परत आणून द्या...'; आमदार श्वेता महालेंना घटस्फोटीत नवऱ्याची आर्त हाक

Buldhana News: एका पतीने आपला संसार वाचवण्यासाठी भावनिक आमदार श्वेता महाले यांना साद घातली. दबाव टाकून 100 रुपयांच्या स्टॅम्पवर करून घेतलेला घटस्फोट रद्द करून आपली पत्नी परत मिळवून देण्याची मागणी त्याने केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, बुलडाणा

लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी 'जनता दरबार' उपक्रमाला सुरुवात केली आहे. या दरबाराच्या पहिल्याच दिवशी अनेक प्रशासकीय तक्रारींसोबतच एक अजब आणि तितकीच भावनिक कौटुंबिक समस्या समोर आली, ज्याची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.

100 रुपयांच्या स्टॅम्पवर घटस्फोट?

बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आमदार श्वेता महाले यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला. या अर्जात त्याने नमूद केले की, त्याचा घटस्फोट झाला आहे, पण तो अधिकृतपणे न्यायालयात झालेला नाही. केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आणि आपल्या इच्छेविरुद्ध, दबावातून हा घटस्फोट लिहून घेण्यात आला आहे. "मला माझ्या पत्नीसोबतच राहायचे असून, हा बेकायदेशीर घटस्फोट रद्द करावा आणि माझी पत्नी मला परत आणून द्यावी," अशी विनंती या पतीने अर्जाद्वारे केली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Nagraj Manjule: नागराज मंजुळेसह जिओ सिनेमाला पुणे न्यायालयाचा दणका! 'खाशाबा'चा वाद थेट कोर्टात)

आमदारांकडून मागणीची दखल

जनता दरबारात आलेल्या या अर्जाची गांभीर्याने दखल घेत आमदार श्वेता महाले यांनी या व्यक्तीचे सांत्वन केले. केवळ कागदोपत्री कारवाई न करता, दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. "कुटुंब तुटण्यापेक्षा ते पुन्हा कसे सांधता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. सामोपचाराने या वादावर पडदा टाकून त्यांचा संसार सुरळीत करण्यासाठी मध्यस्थी केली जाईल," असे आमदार महाले यांनी स्पष्ट केले.

(नक्की वाचा-  Dombivli News: खाऊ आणायला गेलेली आई आलीच नाही; 3 चिमुरड्यांचे रस्त्यावरच रडून-रडून हाल!)

जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार श्वेता महाले यांच्या या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या पायाभूत सुविधांच्या तक्रारींसोबतच कौटुंबिक वादाचे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले. 
 

Topics mentioned in this article