जाहिरात

Buldhana News : बुलढाण्यातील महिलेच्या 'सरकटी लाश' प्रकरणाची अधिवेशनात चर्चा; मुख्यमंत्री पोलिसांवर संतापले!  

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आलेल्या धडावेगळं शीर प्रकरणाचं गूढ अजूनही उकललेलं नाही.

Buldhana News : बुलढाण्यातील महिलेच्या 'सरकटी लाश' प्रकरणाची अधिवेशनात चर्चा; मुख्यमंत्री पोलिसांवर संतापले!  

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आलेल्या धडावेगळं शीर प्रकरणाचं गूढ अजूनही उकललेलं नाही.  तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरून , पोलिसांनी एका तरुणीच्या वडिलांना आणि भावाला अटक केली होती. परंतु तरुणी पोलीस ठाण्यात हजर झाल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली. 

पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह...

पोलिसांचा तपास आणि  निरपराध दोघांवर केलेल्या कारवाईमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, दिशाभूल करणाऱ्या तपासावरून अनेक पोलिसांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली. असं असताना पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत हा मुद्दा लावून धरला. यावर, उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निष्कासित करण्यात येणार असल्याचं सांगितलं. इतकच नव्हे तर, पोलिसांची वागणूक चुकीचीच होती असेही ते यावेळी  म्हणाले.

नक्की वाचा - Chandrapur News : दुचाकीसमोर अचानक हत्ती, वाहन टाकून पळाले, पण हत्तीने पाठलाग करून जीवच घेतला; चंद्रपुरात खळबळ

नेमकं काय आहे प्रकरण? 

बुलढाण्यातील जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारात सापडलेल्या अर्धवट जळालेल्या आणि मुंडके आणि धड वेगळं असलेल्या मृतदेहाचे गूढ अधिकच वाढलं आहे. शिवानी जिवंत सापडली असल्याने तपास यंत्रणेसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. दरम्यान तिची ओळख पटविणाऱ्यावला ५० हजार रुपये बक्षीस जाहीर केलं आहे. 

तपासात AI ची मदत...

दफन करण्यात आलेल्या या महिलेची कवटी घेऊन त्याच्या मदतीने फेशियल रीकन्स्ट्रक्शन करून ओळख पटविण्यात येणार आहे. या कवटीच्या आधाराने महिलेचा चेहरा कसा दिसत असेल याचा अभ्यास केला जाणार आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com