जाहिरात

Chandrapur News : दुचाकीसमोर अचानक हत्ती, वाहन टाकून पळाले, पण हत्तीने पाठलाग करून जीवच घेतला; चंद्रपुरात खळबळ

सावली तालुक्यात रानटी हत्तींच्या वाढत्या वावराने आणखी एका नागरिकाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Chandrapur News : दुचाकीसमोर अचानक हत्ती, वाहन टाकून पळाले, पण हत्तीने पाठलाग करून जीवच घेतला; चंद्रपुरात खळबळ

मनीष रक्षमवार, प्रतिनिधी

Chandrapur News : सावली तालुक्यात रानटी हत्तींच्या वाढत्या वावराने आणखी एका नागरिकाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्याहाड येथील अतुल गोहने दुचाकीवरुन सोनापूरकडे जात असताना व्याहाड–सोनापूर मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक रानटी हत्ती आल्याचं सांगितलं जात आहे. समोर हत्ती दिसताच त्यांनी प्रसंगावधान राखत दुचाकी रस्त्यावरच सोडली आणि जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र संतप्त हत्तीने त्यांचा पाठलाग करून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या भीषण हल्ल्यात अतुल गोहने यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण सावली तालुक्यात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

नक्की वाचा - Mumbai News : मुंबईकरांवरील विघ्न संपेना! कोसळलेलं झाड पाहायला गेलेल्यांवरच 'संक्रांत'; 9 जणं रुग्णालयात भरती

हत्तींचा वावर वाढला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

गेल्या अनेक आठवड्यांपासून सावली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा मुक्त संचार सुरू आहे. हत्तींकडून शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाच आता मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही अनेक गावांमध्ये हत्तींचा वावर आढळून आला असून नागरिकांमध्ये सतत भीतीचं वातावरण आहे. या घटनेनंतर वनविभागाच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. हत्तींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण, नागरिकांना वेळेवर इशारे आणि संवेदनशील भागात तातडीने सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी परिसरातून होत आहे. दरम्यान, हत्तीच्या हल्ल्याबाबतची माहिती प्राथमिक स्वरूपाची असून घटनेचा नेमका तपशील आणि मृत्यूचं कारण वनविभागाच्या अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com