ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा - CM शिंदे

ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब आणि बारवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब आणि बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना बुधवारी (26 जून) दिले आहेत.

(नक्की वाचा: सावधान! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, डॉक्टरसह मुलीलाही संसर्ग)

पुण्यात अमली पदार्थांविरोधात कारवाई

पुण्यामध्ये काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझरने नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरामध्ये या संदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीने ठाणे शहर आणि मिरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामे ही बुलडोझरने नष्ट करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

(नक्की वाचा: संतापजनक! नमाज पठणादरम्यान ओळ चुकल्याने पतीने पत्नीसोबत केले भयंकर कृत्य)

अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करा - मुख्यमंत्री

अमली पदार्थामुळे तरुणाईचे मोठे नुकसान होत आहे. हा विळखा तातडीने रोखणे महत्त्वाचे आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू करावी. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. 

(नक्की वाचा: पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM शिंदेंचे मोठे पाऊल, पोलीस आयुक्तांना दिले हे निर्देश)

महाराष्ट्राच्या प्रगतीला बळ देणारं अधिवेशन ठरेल, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार- फडणवीस

Topics mentioned in this article