- राहुल कुलकर्णी
नमाज पठण करताना ओळ चुकल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर बशीर खान (वय 29 वर्ष) या व्यक्तीविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा: ज्याला भाऊ म्हणत होती, तोच प्रियकर निघाला; दोन मुलींच्या आईचा गळा आवळून खून)
नेमके काय घडले?
घरामध्ये नमाज पठण करत असताना पत्नीकडून नकळत एक ओळ चुकली. यामुळे समीर बशीर खानचा राग अनावर झाला. 'तुझे नमाज पढना नही आता, असे म्हणत त्याने पत्नीला अक्षरशः लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात सुरुवात केली.
(नक्की वाचा:शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले अन् 1 कोटींना लागला चुना; साताऱ्यातील बाप-लेकासोबत काय घडलं?)
मारहाणीमध्ये त्याची पत्नी जखमी झाली आहे. तिच्या दंडावर आणि उजव्या पायावर गंभीर दुखापत झाली आहे. पुण्यातील येरवडा परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या तक्रारीवरून समीर बशीर खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा: कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक! विमानतळ अधिकाऱ्यानं महिलेच्या वेशात का केला आयुष्याचा शेवट?)
Quaiser Khalid | कोण आहेत कैसर खालिद?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world