KEM Hospital: केईएम हॉस्पिटलचे नाव बदलणार? मंगलप्रभात लोढांचे पालिकेला पत्र, 'या' नावाचा प्रस्ताव

मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलेल्या या मागणीनंतर जोरदार वादही रंगला होता. आता पुन्हा एकदा मंगलप्रभात लोढांनी ही मागणी केल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

KEM Hospital Name Change:  मुंबईतील प्रसिद्ध केईएम म्हणजेच 'किंग एडवर्ड मेमोरियल' या रुग्णालयाचे नाव बदलण्याची मोठी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबई पालिकेला पत्रही पाठवले असून केईएमचे नाव "कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय" असं करावं असं लोढा यांनी म्हटलं आहे. 

Crime News: सायबर टोळीवर मकोका!11 कोटींची लुट, 3 राज्यांचं कनेक्शन.. पिंपरी चिंचवड पोलिसांचा दणका

KEMचे नाव बदला, मंगलप्रभात लोढांची मागणी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील प्रसिद्ध KEM रुग्णालयाच नाव बदलण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई पालिकेला पत्र लिहिले आहे. KEM रुग्णालयाचे नाव "कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय" कराव असं मंत्री लोढा यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केईएमच्याा नामांतरावरुन वाद रंगण्याची शक्यता आहे. 

Advertisement

ऐईएमचे नाव इंग्रजी असल्याने ब्रिटिशांच्या काळातील हे नाव असल्याने ते बदलण्याची शिफारस मंगलप्रभात लोढांनी केली. याआधी जानेवारी २०२६ मध्ये KEM रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात लोढा यांनी मागणी केली होती. मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलेल्या या मागणीनंतर जोरदार वादही रंगला होता. आता पुन्हा एकदा मंगलप्रभात लोढांनी ही मागणी केल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

Fraud Case: उपजिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न भंगलं, 2 कोटीही गेले! गडचिरोलीच्या तरुणाला पुण्यात गंडा

पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय?

'स्वदेशी' या प्रेरणादायी संकल्पनेच्या प्रभावाखाली आपला देश समृद्ध स्वदेशी वारसा पुर्नप्रस्थापित आणि गौरवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, सार्वजनिक संस्थांची नावे पुनर्विचारात घेणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. अजूनही अनेक संस्था वसाहतवादी काळातील नावे वापरतात, जी दास्याच्या काळाची आठवण करून देतात.

या नावांची जागा आपल्या स्वतःच्या संस्कृती, मूल्यांना आणि प्रेरणादायी ऐतिहासिक व्यक्तींना सन्मान देणाऱ्या नावांनी घेतली पाहिजे. या संदर्भात, किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालय या मुंबईतील संस्थेचे नामकरण झाल्यास भारतीय इतिहास आणि संस्कृतीतून निवडलेले नाव भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देईल.