
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. साडे तीन शुभ मुहूर्त पैकी एक शुभ मुहूर्त असल्याने व मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. या निमित्तानं देवीला शिवकालीन दागिने घालत अलंकार पुजा करण्यात आली. दुष्काळाचे संकट टळावे यासाठी देवीला साकडे घालण्यात आले.

तुळजाभवानी मंदीराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली
देवीची पहाटे आरती करुन तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर वेगवेगळ्या रंगाच्या साडीची गुढी उभारण्यात आली. त्याला भगवा ध्वज लावण्यात आला. तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा, वाकोजी बुवा यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण केला. तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. देवीची विधिवत पुजाही करण्यात आली.

तुळजाभवनीला गुढीपाडव्या निमित्त शिवकालीन अलंकार घालण्यात आले.
रामाराज्यापासून गुढी उभारण्याचीही तुळजापूरमध्ये परंपरा आहे. मंदीराच्या कळसावर गुढी उभारल्यानंतर तुळजापूरच्या प्रत्येक घरात गुढी उभारली जाते. गुढीपाडव्याला देवीला शिवाकालीन अलंकार घातले जातात. यावेळी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world