Chandrapur Crime: महाराष्ट्र सुन्न! नवऱ्याने पत्नीला जाळून मारलं; आग लावली अन् दार लावून घेतलं, भयंकर घटना

विवाहितेच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले असून पत्नीला त्यानेच पेटवून दिल्याचा खळबळजनक खुलासा विवाहितेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर: 

Chandrapur News:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरु आहे. अशातच चंद्रपूरमध्ये 27 वर्षीय विवाहितेचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले असून पत्नीला त्यानेच पेटवून दिल्याचा खळबळजनक खुलासा विवाहितेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. 

पतीनेच पत्नीला पेटवले..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर शहरातली एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. महाकाली वार्डातील गौतम नगर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय दीक्षा शुभम भडके या तरुण विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या मृत्यूला तिचा पती  कारणीभूत ठरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Pregnancy Diagnosis: धावत्या गाडीतचं सुरु होतं महापाप! पोलिसांनी पकडलं, दृश्य पाहून हादरले; बोगस डॉक्टर अटकेत

मृतक दीक्षा भडके हिचा पती शुभम भडके याने ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास घरी येऊन पत्नीला जाळून घराबाहेरून दार बंद करून निघून गेल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. आरडाओरड झाल्यानंतर घरातील दार उघडल्यावर दीक्षा जळालेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

विवाहितेचा मृत्यू

मात्र उपचार सुरू असतानाच ७ जानेवारी रोजी दीक्षाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांनी सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून मृतकाच्या पतीला अटक करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण काय, हे तपासातून पुढे येणार आहे.

Advertisement

Beed Crime: बीडमध्ये ATSची मोठी कारवाई! दोघांना उचललं; बनावट ट्रस्ट अन् कोट्यवधींचा घोटाळा उघड