सौरभ वाघमारे, सोलापूर:
Solapur illegal Gestational Diagnosis Center: धावत्या कारमध्ये गर्भलिंग निदान केंद्र सुरु असल्याचा धक्कादायक आणि हादरवणारा प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. बार्शी तालुक्यामध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात बोगस डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सर्व गर्भपाताचे साहित्य जप्त करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
धावत्या कारमध्ये सुरु होतं महापाप...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना सोलापूरच्या बार्शी तालुक्यात उघडकीस आली आहे. आलिशान कारमध्ये फिरते गर्भलिंग निदान केंद्र चालवणाऱ्या एका बोगस डॉक्टरला बार्शी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अजित सुरेश मस्तूद असे या बोगस डॉक्टरचे नाव असून, त्याच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह मोठ्या प्रमाणात गर्भपाताचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Beed Crime: बीडमध्ये ATSची मोठी कारवाई! दोघांना उचललं; बनावट ट्रस्ट अन् कोट्यवधींचा घोटाळा उघड
बार्शी तालुक्यातील जामगाव परिसरात एका आलिशान कारमधून बेकायदेशीर हालचाली होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून या कारची झडती घेतली असता, त्यात सुरू असलेले भयानक वास्तव समोर आले. या कारमध्ये केवळ सोनोग्राफी मशीनच नव्हती, तर गर्भपातासाठी लागणाऱ्या प्रतिबंधित गोळ्या आणि रक्ताने माखलेले वैद्यकीय साहित्यही आढळले.
बोगस डॉक्टरला अटक...
या प्रकरणी पोलिसांनी अजित मस्तूद याला अटक केली आहे. त्याच्यावर 'पीएनडीटी' (PCPNDT) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये महागडी कार आणि पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा समावेश आहे. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात गुंतलेले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world