Chandrapur Mahapalika News: चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदासाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींनी आता अत्यंत नाट्यमय वळण घेतले आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षांना स्पष्ट बहुमत नसल्यामुळे शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. 66 सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत सत्तेसाठी 34 हा बहुमताचा आकडा आहे. दरम्यान, शिवसेना (उबाठा) गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चंद्रपूर महापालिकात भाजप आणि ठाकरे गटाचा महापौर बसणार हे स्पष्ट झालं आहे.
ठाकरे गटाचा भाजपला पाठिंबा
भाजपचे किशोर जोरगेवार याबाबत बोलताना स्पष्ट केले की, "शिवेसना ठाकरे गटासोबत आम्ही युती करत आहोत. महापौर हा भाजपचा असेल. संगीता राजेंद्र खांडेकर यांच्या नावे आम्ही व्हीप काढला आहे, त्या महापौरपदाच्या उमेदवार असतील. पुढील सवा वर्ष ठाकरे गटाला असतील, पहिली सवा वर्ष भाजपचा महापौर असेल. स्थायी समिती ही उबाठाला असेल. आमचे संख्याबळ जास्त असल्याने उबाठाला महापौरपद देणं योग्य नव्हतं. विकासाच्या दृष्टीने उबाठाने भाजपला पाठिंबा दिला आहे."
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईत गाडी चालवण्यासाठी भरावा लागणार 'कंजेश्चन टॅक्स'? भाजप नेत्याचा BMC ला प्रस्ताव)
"महापौर बसावा ही आमची इच्छा होती"
तर शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी म्हटलं की, "आमच्या पक्षाचा महापौर बसावा ही आमची इच्छा होती. विषय होता की पहिले की दुसरे. काँग्रेसशी आम्ही वारंवार चर्चा केली, मात्र ते आम्हाला पाच वर्षात एकदाही महापौरपद देण्यासाठी तयार नव्हते. आमदार किशोर जोरगेवार आमच्या संपर्कात होते. पहिले सव्वा वर्ष भाजपचा महापौर, दुसरे सव्वा वर्ष शिवसेने ठाकरे गटाचा महापौर असेल. स्थायी समिती पहिले आणि चौथे वर्ष शिवसेनेकडे आणि उपमहापौरपद हे देखील शिवसेनेकडे असेल. आम्ही एक पाऊल मागे आलो. काहीही नसल्यापेक्षा एक पाऊल मागे येणं सोयीचं असतं."
(नक्की वाचा- Sharad Pawar Health Update: शरद पवारांची तब्येत कशी आहे? सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची अपडेट)
चंद्रपूर महापालिका पक्षीय बलाबल
- (काँग्रेस 27) + (जनविकास सेना 3)- एकूण - 30
- (भाजप 23) + (शिंदे सेना 1) - एकूण - 24
- ठाकरे सेना - 6
- वंचित- 2
- MIM - 1
- BSP - 2
- बंडखोर - 4
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world