
Chandrapur News : आज बैलपोळ्याचा सण आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. कृषी प्रधान देशात शेतीला आणि बैलांना विशेष महत्त्व आहे. आजही आपली गुजराण ही शेतीतूनच होते. अशा शेतात राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता म्हणून बैलपोळा (bail pola 2025) हा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागात हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. बैलाला सजवलं जातं, घरात पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला जातो. नवीन कपडे घातले जातात. अनेक गावांमध्ये मिरवणुकही काढली जाते.
दरम्यान चंद्रपुरातील या गावात बैलपोळ्याच्या सणाला स्मशान शांतता पसरली आहे. बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतात कीटकनाशक औषध प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यातील अडेगांवात घडली आहे. गणपत भाऊजी नागापुरे असे मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
नक्की वाचा - Nagpur News : 'मी काळी जादू जाणतो' सांगत महिलेपुढे कपडे काढले; भोंदूबाबाच्या कृत्याने जिल्ह्यात संताप
नागापुरे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. दरवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे त्यांचा शेतीचे मोठे नुकसान होत असतं. यावर्षी त्यांनी तीन एकरमध्ये कापूस, धान पेरले. यंदा तरी चांगलं उत्पन्न मिळेल असा त्यांना विश्वास होता. मात्र वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे त्यांची शेती पाण्याखाली आली. अद्यापही त्यांची शेती पाण्याखालीच आहे. मोठ्या कष्टाने फुलविलेल्या शेतीचे डोळ्यादेखत नुकसान होताना बघने त्यांना असह्य झाले. याच विचारातून त्यांनी शेत गाठले. शेतात असलेली कीटकनाशक औषध प्राशन करून जीवन संपविल्याची घटना पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world