जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar: उमेदवारीवरून भररस्त्यात राडा! MIMचे दोन गट भिडले; रॅलीमध्येच जुंपली

या राड्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.

Chhatrapati Sambhajinagar: उमेदवारीवरून भररस्त्यात राडा! MIMचे दोन गट भिडले; रॅलीमध्येच जुंपली

Chhatrapati Sambhajinagar Election 2026:  ​छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहरातील किराडपुरा भागात एमआयएम (AIMIM) पक्षाच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक १२ मधून मोहम्मद इसरार यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. या निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी भव्य रॅली काढली होती. मात्र, ही रॅली किराडपुरा भागात पोहोचताच दुसऱ्या गटाने तिला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला.

​या संघर्षाचे मुख्य कारण म्हणजे प्रभाग क्रमांक १२ मधून निवडणूक लढवण्यासाठी हाजी इसाक हे देखील इच्छुक होते. पक्षाने मोहम्मद इसरार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने हाजी इसाक यांचे समर्थक प्रचंड संतापले होते. इसरार यांची रॅली किराडपुरा भागात येताच हाजी इसाक यांच्या समर्थकांनी रॅली अडवली. सुरुवातीला दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली, मात्र काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

Pune Election 2026: घड्याळ- तुतारीवरुन वादंग! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली; सूत्रांची माहिती

रॅलीवर हल्ला आणि कार्यकर्त्यांची मारहाण

​मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त कार्यकर्त्यांनी रॅलीवर हल्ला चढवला. यावेळी मोहम्मद इसरार यांच्या समर्थकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रॅलीत गोंधळ उडाला आणि नागरिक भयभीत झाले. या राड्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले, तोपर्यंत रॅली अर्ध्यावरच थांबवावी लागली.

​निवडणुकीपूर्वी एमआयएममधील गटबाजी चव्हाट्यावर

​महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएममधील अंतर्गत गटबाजी या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. एकाच प्रभागातील दोन बड्या नेत्यांचे समर्थक आपापसात भिडल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. किराडपुरा भागात झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, आगामी काळात ही गटबाजी पक्षाला महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dombivli News : ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवणार, शिंदेंचा ठाकरेंवर डोंबिवलीतून थेट प्रहार, युतीबाबत म्हणाले..

Listen to the latest songs, only on JioSaavn.com