Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026: रास, योग, शुभ मुहूर्तानुसार उमेदवारी अर्ज कधी भरावा?

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026: राशीनुसार कोणत्या तारखेनुसार आणि कोणत्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करावा, जाणून घ्या वेदमूर्ती अनंत पांडव यांनी दिलेली माहिती...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026: राशीनुसार उमेदवारी अर्ज भरावा का?"
Canva

- मोसिन शेख, प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026: ​छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झालीय. इच्छुक उमेदवारांनी आता शुभ मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयारी केलीय. हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या कार्याची सुरुवात करताना मुहूर्त पाहण्याची परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणते दिवस आणि कोणत्या वेळा राशीनुसार फलदायी ठरतील? याची सविस्तर माहिती वेदमूर्ती अनंत पांडव यांनी दिलय. योग्य मुहूर्तावर केलेले कार्य विजय मिळवू देऊ शकतात का? याबाबत वेदमूर्ती पांडव यांनी काय माहिती दिलीय, जाणून घेऊया सविस्तर... 

"27 डिसेंबर आणि 30 डिसेंबरला अर्ज भरणे टाळा"

महानगरपालिकेच्या ​निवडणूक प्रक्रियेत आठ दिवसांचा कालावधी उपलब्ध असला तरी ज्योतिषशास्त्रानुसार यापैकी केवळ सहा दिवसच अर्ज भरण्यासाठी योग्य आहेत. 27 डिसेंबर रोजी 'व्यतिपात योग' असल्याने आणि 30 डिसेंबर रोजी 'तिथीचा क्षय' असल्याने हे दोन दिवस अत्यंत अशुभ मानले गेले आहेत. या दोन दिवशी कोणत्याही राशीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करू नयेत, असा सल्ला देण्यात आलाय. या दिवशी केलेले कार्य अडचणींचे ठरू शकते,  त्यामुळे उमेदवारांनी या तारखांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

​राशीनुसार शुभ आणि अशुभ मुहूर्त

​23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालीय. 23 डिसेंबर रोजी तूळ आणि मिथुन राशीच्या उमेदवारांनी अर्ज भरू नये, असाही सल्ला ज्योतिषींनी दिलाय. 24 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेनंतर मुहूर्त असून तूळ, मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ टाळण्याजोगा आहे. 25 डिसेंबर आणि 26 डिसेंबर हे दिवस मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तूळ, धनू, मकर आणि कुंभ या राशींसाठी अत्यंत शुभ आहेत, मात्र याच काळात वृश्चिक, कर्क आणि मीन राशीच्या उमेदवारांनी सावध राहावे. 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर हा दिवशीही बहुतांश राशींसाठी अनुकूल स्थिती आहे.

Advertisement

(नक्की वाचा: Aries Horoscope 2026: अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतील, मेष राशीने 2026 कोणते उपाय करावे?)

​राजयोग आणि उपासना महत्त्वाची

​उमेदवारी अर्ज भरताना केवळ मुहूर्त पाहून चालणार नाही तर उमेदवाराच्या कुंडलीत 'राजयोग' असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. वेदमूर्ती अनंत पांडव यांच्या मते, ज्यांच्या कुंडलीत विजयाचे योग आहेत, त्यांना मुहूर्ताची साथ मिळाल्यास प्रक्रिया अधिक सुलभ होते. विजय मिळवण्यासाठी केवळ नशिबावर अवलंबून न राहता, राशीनुसार उपासना आणि कर्मयोगाची जोड देणे आवश्यक आहे. योग्य वेळेस, योग्य मुहूर्तावर आणि पूर्ण श्रद्धेने अर्ज भरल्यास विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Advertisement

(नक्की वाचा: Mulank 1 Numerology 2026: करिअर आणि व्यवसायात काय बदल होतील? मुलांक 1साठी वर्ष 2026 कसं असेल, काय करावे उपाय?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)