जाहिरात

Mulank 1 Numerology 2026: करिअर आणि व्यवसायात काय बदल होतील? मुलांक 1साठी वर्ष 2026 कसं असेल, काय करावे उपाय?

Mulank 1 Numerology Yearly Prediction 2026: अंक ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म 01, 10, 19 किंवा 28 तारखेला झालेला असतो, त्यांचा मुलांक 1 असतो. मुलांक 1 असणाऱ्यांसाठी वर्ष 2026 कसे ठरणार आहे, याबाबत माहिती जाणून घेऊया...

Mulank 1 Numerology 2026: करिअर आणि व्यवसायात काय बदल होतील? मुलांक 1साठी वर्ष 2026 कसं असेल, काय करावे उपाय?
"Mulank 1 Jyotish Rashifal: मुलांक 1 साठी 2026 कसे असेल?"
Canva

- ज्योत्स्ना मदान, अंक ज्योतिषी

Mulank 1 Rashifal: अंकशास्त्रानुसार मुलांक 1 असणाऱ्या व्यक्ती प्रभावीशाली, धाडसी आणि दृढनिश्चयी असतात. एखादी ठरवलेली गोष्ट ते पूर्ण केल्याशिवाय शांत होत नाहीत. अंकशास्त्रानुसार सूर्य हा मुलांक 1चा स्वामी ग्रह आहे. 2026मध्येही सूर्य ग्रहाशी संबंधित प्रभाव पाहायला मिळणार आहेत. नवीन वर्ष मुलांक 1 असणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वावलंबी होण्यासाठी चांगल्या संधी घेऊन येणार आहे. ज्याप्रकारे सूर्य कोणत्याही अडथळ्याविना रोज सजीवसृष्टीच्या आयुष्यात प्रकाश आणतो, त्याचप्रमाणे मुलांक 1 असणारे लोकही 2026मध्ये स्वतःचे जीवन अधिक चांगलं होण्यासाठी दररोज सकारात्मक पद्धतीने प्रकाश पसरवण्याचे काम करतील. अंक ज्योतिषी ज्योत्स्ना मदान यांनी दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया...

नवीन संधींचा पूर्ण फायदा घ्याल

आपल्या नेतृत्वगुणांमुळे हे लोक जीवनात नवीन संधी आकर्षित करतील. नवीन वर्षात धनलाभाशी संबंधित संधी देखील प्राप्त होतील. 2025मध्ये तुम्ही काही योजना आखल्या असतील तर 2026मध्ये तुम्ही त्या पूर्ण करण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलू शकता. आपल्या प्रतिनिधित्व शैलीचा वापर करून तुम्ही त्या योजना 2026मध्ये पुढे न्याल. त्या निर्णायक योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंतचा काळ तुमच्यासाठी शुभ राहील.

मेहनतीने मिळेल मनासारखे यश

वर्ष 2026मध्ये तुमच्या प्रगतीसाठी नवे मार्ग खुले होतील. यासह तुम्हाला प्रत्येक पावलावर आव्हानांचाही सामना करावा लागेल. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. कोणत्याही कामामध्ये कष्ट कमी पडू देऊ नका आणि आत्मविश्वासाने पुढे जा. मुलांक 1 असणाऱ्यांनी अहंकार टाळला पाहिजे.

आर्थिक स्थिती कशी असेल?

मुलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी एप्रिल 2026नंतर करिअर आणि व्यवसायाकरिता नवीन संधी प्राप्त होतील. यादरम्यान तुम्हाला काही तडजोडही कराव्या लागू शकतात. समजूतदारीने निर्णय घ्यावा. नोकरी आणि व्यवसायामध्ये आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. शॉर्टकट, टॅक्स चोरी किंवा कागदपत्रांच्या व्यवहारामध्ये निष्काळजीपणा करू नये. आपली कामं प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

सावधगिरीने निर्णय घ्यावे

2026मध्ये मुलांक 1 असणारे लोक आपले व्यक्तिमत्त्व आणि दूरदृष्टीच्या जोरावर नवीन योजनांचा विस्तार करण्याचे काम करतील. या काळात तुम्हाला सहकार्याच्याही संधी मिळतील. पण सर्वांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळावे. हे वर्ष सूर्याचे असल्याने काही प्रसंगी तुमचा अभिमान दुखावला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत गोष्टी स्पष्ट करून पुढे जाणे योग्य ठरेल. कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा, कारण फसवणूक होण्याचा धोका आहे. कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घ्या.

New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय

(नक्की वाचा: New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय)

व्यवसायात घाईघाईनं घेतलेल्या निर्णयामुळे फसवणूक होऊ शकते. या वर्षात तुम्हाला अनेक संधी मिळाल्या तरीही निर्णय घेण्यापूर्वी संयम बाळगा आणि योग्य निर्णय घ्या. ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू नका. मार्च-एप्रिल महिन्यानंतर नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात, पण तुम्हाला समजूतदारपणे निर्णय घ्यावे लागतील. मुलांक 1 असणाऱ्या लोकांना नवीन वर्षात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन करावे, कारण घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकतात.

नातेसंबंध कसे राहतील?

2026 मध्ये नातेसंबंध अधिक मजबूत होतील. पती-पत्नीमधील प्रेम आणि विश्वास वाढेल. प्रेमीयुगुल एकाच कामात सहभागी होऊ शकतात. या वर्षी अविवाहित लोक त्यांच्या जीवनसाथीसोबत एक नवीन नातेसंबंध सुरू करतील. जर तुम्ही दोघे एकाच व्यवसायात असाल तर परस्पर समजूतदारपणामुळे तुम्ही उत्तम संधी फायदेशीर संधींमध्ये बदलू शकता. 2026 मध्ये नातेसंबंधांमध्ये पैसा हा एक महत्त्वाचा घटक असेल. नातेसंबंध सुरळीत चालावेत यासाठी तुमचा अहंकार नियंत्रणात ठेवणे उचित ठरेल.

विद्यार्थ्यांसाठी वर्ष 2026 कसे असेल?

मुलांक 01 असणारे विद्यार्थी एखाद्या परीक्षेसाठी तयारी करत असतील तर एकाग्र राहणे अतिशय आवश्यक आहे. परीक्षेची तयारी पूर्ण मनाने करावी लागेल. क्षुल्लक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका.

Astrology Predictions For 2026: शनी-नेपच्यून युती 3 राशींसाठी ठरणार वाईट, 2026 वर्ष कोणत्या राशींसाठी असेल लाभदायी ?

(नक्की वाचा: Astrology Predictions For 2026: शनी-नेपच्यून युती 3 राशींसाठी ठरणार वाईट, 2026 वर्ष कोणत्या राशींसाठी असेल लाभदायी?)

आरोग्य कसे राहील?

आरोग्याच्या दृष्टिकोनातून हिवाळा ऋतू तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. कफ प्रकृती असणाऱ्या लोकांनी या काळात काळजी घ्यावी आणि दैनंदिन जीवनात शिस्त आणणे गरजेचे आहे. 2026 मध्ये तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि कौटुंबिक संबंध चांगले राखण्याच्या प्रयत्नात आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. स्वतः सर्वकाही करण्याच्या घाईत तुम्हाला डोकेदुखी, मायग्रेन आणि पॅनिक अटॅक यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या समस्या टाळण्यासाठी डिसेंबर 2025 पासून दैनंदिन दिनचर्याचे नियोजन आखा. योग आणि प्राणायमचा सराव करावा. दररोज सकाळी 10 ते 15 मिनिटे सूर्यासमोर उभे राहा आणि सूर्यदेवाचे आशीर्वाद घ्या.

हे उपाय नक्की करा
  • शंकराच्या पिंडीवर गूळ, पाणी आणि दूध अर्पण करा.

  • सूर्य नमस्कार, प्राणायाम, योगासनांचा सराव करा.
  • थोड्याथोड्या अंतराने काम करताना ब्रेक घ्या.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com