जाहिरात

Maharashtra Politics: संभाजीनगरमध्येही महायुती धोक्यात! राष्ट्रवादीनंतर शिंदे गटाच्या निर्णयाने मोठा ट्वीस्ट

युतीच्या अधिकृत घोषणेची वाट न पाहता, पक्षाने आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांना तातडीने उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Politics: संभाजीनगरमध्येही महायुती धोक्यात! राष्ट्रवादीनंतर शिंदे गटाच्या निर्णयाने मोठा ट्वीस्ट

Chhatrapati Sambhajinagar Election 2026:  ​छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नसल्याने अखेर शिंदेसेनेचा संयम सुटला आहे. युतीच्या अधिकृत घोषणेची वाट न पाहता, पक्षाने आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांना तातडीने उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, युतीमध्ये बिघाडी तर झाली नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

​भाजपच्या प्रस्तावाची प्रतीक्षा संपली; शिरसाटांनी घेतली तातडीची बैठक

​मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दिवसभर शिंदेसेनेचे नेते भाजपच्या नवीन प्रस्तावाची प्रतीक्षा करत होते. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत भाजपकडून कोणताही सकारात्मक प्रस्ताव किंवा निरोप आला नाही. अर्ज भरण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. वेळेचे गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी रात्री उशिरा आपल्या निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर 'आता थांबून चालणार नाही' असा सूर उमटला आणि इच्छुकांना मैदानात उतरण्याचे आदेश देण्यात आले.

Pimpri Chinchwad: 'असले धंदे खपवून घेऊ नका!' पिंपरी-चिंचवडमधील सभेत अजित पवारांचा भाजपवर थेट निशाणा

​आजपासून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल होणार

​पालकमंत्र्यांच्या या आदेशानंतर शिंदेसेनेचे सर्व इच्छुक उमेदवार आजपासून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यासाठी आता अत्यंत कमी वेळ उरला असल्याने, आज शहरात शिंदेसेनेकडून मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळू शकते. युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे वारंवार सांगितले जात असताना, शिंदेसेनेने उचललेले हे पाऊल भाजपवर दबाव टाकण्यासाठी आहे की स्वतंत्र लढण्याची ही तयारी आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

​शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे युती धोक्यात?

​छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणात भाजपनेही अनेक जागांवर आपला दावा ठोकला आहे. जागावाटपाच्या या रस्सीखेचामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते. आता शिंदेसेनेने थेट उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिल्याने भाजपची पुढची चाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना अर्ज भरायला लावले, तर मैत्रीपूर्ण लढत होणार की शेवटच्या क्षणी तडजोड होऊन अर्ज मागे घेतले जाणार, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.

मीरा–भाईंदरमध्ये महायुती संकटात? "24 तासांत निर्णय घ्या, नाहीतर.." शिवसेनेच्या 'या' मंत्र्याचा भाजपला इशारा

Listen to the latest songs, only on JioSaavn.com