जाहिरात

Thane Election News: ठाण्यात भाजप- शिवसेनेचं जुळेना! जागा वाटपावरुन वादंग; एकत्र लढणार का?

शिवसेनेच्या सिटिंग नगरसेवकाच्या ठिकाणी देखील भाजप पक्षाची ताकद वाढल्याने दोन्ही पक्षांची सीटिंग सीटवर मागणी केली जात आहे. 

Thane Election News: ठाण्यात भाजप- शिवसेनेचं जुळेना! जागा वाटपावरुन वादंग; एकत्र लढणार का?

रिझवान शेख, ठाणे:

Thane Shivsena BJP Alliance News: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या काही दिवसात राज्यात मोठ्या राजकीय उलथा-पालथी पहायला मिळणार आहेत. यापैकी महत्त्वाचं म्हणजे मुंबई, ठाण्यात महायुती एकत्र लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबतच आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून ठाण्यामध्ये महायुतीच्या वाटाघाटी काही जुळत नसल्याचे चित्र दिसत आहे. 

ठाण्यात भाजप- शिवसेनेचं जुळेना...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये एकत्र लढण्याबाबत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी सुरु आहेत. मात्र महायुतीच्या बैठकीत जागा वाटपावरुन कलगीतुरा रंगत असल्याचे दिसत आहे. भाजपकडून शिवसेनेकडे १३१ पैकी ५० पेक्षा अधिक जागांची मागणी केली जात आहे.  शिवसेनेच्या सिटिंग नगरसेवकाच्या ठिकाणी देखील भाजप पक्षाची ताकद वाढल्याने दोन्ही पक्षांची सीटिंग सीटवर मागणी केली जात आहे. 

BMC Election: मुंबई महापालिकेत महायुतीचा पेच! एका मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेमधील चर्चा थंडावली?

मात्र शिवसेना शिंदे गटाला हा पर्याय मान्य नाही. सिटिंग नगरसेवकांच्या जागा मागितल्याने दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाला आहे. त्यामुळे बैठकीमध्ये योग्य तो तोडगा निघाला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. आता एकाच जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन्ही पक्षाची ताकद असल्याने एका पॅनलमध्ये दोन्ही पक्षाचे उमेदवार मिळून उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

युती होणार का?

दरम्यान, महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचार सभा आणि दौरे, गाठीभेटींना वेग आला आहे.  एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० जानेवारीला ठाण्यात सभा घेणार असल्याचे समोर आले आहे. ठाण्यामध्ये सभा घेऊन भाजपची बाजू मजबूत करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतील. त्याआधी युती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

(नक्की वाचा-  Union Budget 2026: यंदाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी मांडला जाणार की नाही? का आहे संभ्रम?)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com