Chhatrapati Sambhajinagar Car Accident: रस्ता चुकल्यामुळे कार नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ही घटना घडली. या अपघातात कारमधील पती पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी धावलेला तरुणही वाहून गेला, सुदैवाने गाडीचा चालक मात्र उडी मारुन जीव वाचवण्यात यशस्वी ठरला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रस्ता चुकला अन् कार थेट नदीत
याबाबत सविस्तर वृत्त असं की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात सोमवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. पैठण तालुक्यातील चांगतपुरी परिसरात रात्री ११ वाजेच्या सुमारास रस्ता चुकल्यामुळे एक कार थेट जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी धावलेला एक स्थानिक तरुणही पाण्यात वाहून गेला आहे.
Pune News : 7 दिवस पुण्यातील वाहतूक मार्गात बदल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
तीन जण वाहून गेले
ही कार कोरडगावकडून पैठणकडे निघाली होती. कारमध्ये मुकीद अहमद शेख , निलोफर मुकीद शेख आणि चालक अल्ताफ पठाण हे तिघे जण प्रवास करत होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास चांगतपुरी गावाजवळील चांगदेव विद्यालयासमोर कारचा रस्ता चुकला. चालकाने कार रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावरून खाली असलेल्या कालव्यात कोसळली.
सुदैवाने, चालक अल्ताफ पठाण हा स्वतःचा जीव वाचवून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. पण इतर दोन प्रवासी आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला व्यक्ती वाहून गेले आहेत. याबाबतची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचाही शोध सुरु आहे. अपघातातून वाचलेला चालक जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world