जाहिरात

Accident News: खड्ड्यात पडून जिवलग मित्रांचा मृत्यू! एकाला वाचवायला गेला, दोघांनीही जीव गमावला

शनिवारी सायंकाळी फ्रेंडशिपडेच्या पूर्वसंध्येलाच भोईवाड्यात या दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने स्थानिकांसह पोलिसही हळहळले.

Accident News: खड्ड्यात पडून जिवलग मित्रांचा मृत्यू! एकाला वाचवायला गेला, दोघांनीही जीव गमावला

छत्रपती संभाजीनगर: ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. एकीकडे तरुणाईमध्ये 'फ्रेंडशिप डे'चा उत्साह असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका मित्राला वाचवण्याच्या नादात खोल खड्ड्यात पडून दोन्ही जिवलग दोस्तांचा मृत्यू झाल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरात खोदलेल्या खोल खड्याच्या पाण्याजवळ शेख आहाद शेख शरीफ व शिफान शाकेर खान हे दोन जिवलग मित्र खेळण्यासाठी गेले होते, त्यात एकाचा उतारावरून पाय घसरत असल्याचे पाहून दुसरा मित्र त्याला वाचवण्यासाठी धावला. मात्र, खड्यातील गाळात दोघांचे पाय रुतले जाताच क्षणार्धात दोघेही खोलवर बुडाले. तिसऱ्या मित्राने आरडाओरड करत स्थानिकांना बोलावले. मात्र, तोपर्यंत आहाद व शिफानचा मृत्यू झालेला होता. शनिवारी सायंकाळी फ्रेंडशिपडेच्या पूर्वसंध्येलाच भोईवाड्यात या दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने स्थानिकांसह पोलिसही हळहळले.

Latur News : लफडेबाज नवऱ्याला जाब विचारला! सासरच्यांनी विवाहितेला जाळून मारले, लातूर हादरले!

शेख आहाद व शेख शरीफ शिफान दोघेही भोईवाड्यात कुटुंबासह वास्तव्यास होते. सकाळी ८ ला शाळेत गेल्यानंतर दोघेही १२ वाजता घरी परतले. ते राहत असलेल्या परिसरातीलच बोधी सम्राट हॉटेलजवळ एका रिकाम्या प्लॉटवर बांधकाम सुरू होते त्यासाठी ठेकेदाराने जवळपास ८ ते १० फूट खोल खणून ठेवले होते, पावसामुळे यात पाणी साचले होते.

आहाद, शिफान व तिसरा मित्र उमर खान उत्सुकतेपोटी या खड्यात उतरले. त्यात उतारावर पाणी पाहण्यासाठी पुढे गेलेल्या एकाचा पाय घसरला व तो थेट पाण्यात बुडायला लागला. माझा मित्र बुडतोय, हे पाहून दुसऱ्याने धाव घेतली. मागे उभा उमर आरडाओरड करत रस्त्यावर आला. स्थानिकांनी तत्काळ धाव घेतली. तर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे विजय राठोड, दीपराज गंगावणे यांनी धाव घेतली. आहाद, शिफानला बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

( नक्की वाचा : पत्नीनं रचला पतीच्या हत्येचा कट, भावांनी गुंडांना सुपारी दिली पण शेवटच्या क्षणी जबरदस्त ट्विस्ट! )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com