Chhatrapati Sambhajinagar News: हृदयद्रावक! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

जुबेर कलीम सय्यद असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुबेर कलीम सय्यद हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

जाहिरात
Read Time: 1 min

छत्रपती संभाजीनगर: पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मिटमिटा परिसरात असलेल्या सफारी पार्कजवळ ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त असून मृताच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा परिसरातील सफारी पार्कजवळ असलेल्या तलावात एका तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जुबेर कलीम सय्यद असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुबेर कलीम सय्यद हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

काल तो पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली आणि तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, बुडालेल्या तरुणाला बेशुद्धअवस्थेत बाहेर काढत घाटी रुग्णाला दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता पाण्यात गुदमरून त्याचा मृत्यु झाल्याची घोषणा केली. याप्रकरणी छावली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Rahul Gandhi meets Modi: पंतप्रधान कार्यालयात मोदी- राहुल गांधी यांची बैठक, चर्चा काय झाली?