मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला एका गाडीने धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी 25 जून रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू होती. यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाड्या सह्याद्री बाहेर उभ्या करण्यात आल्या होत्या. यावेळी रिज रोडवरुन हँगिंग गार्डनच्या दिशने जाणाऱ्या एका गाडीने उभ्या गाडीला जोरदार धडक दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील तीन वाहतूक पोलीस कर्मचारी आणि एक अधिकारी गाडीतच बसून होते. सुदैवाने यापैकी कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. यानंतर धडक दिलेल्या गाडीचे स्टेअरींग देखील लॉक झाले होते. उपस्थितीत वाहतूक पोलिसांनी धडक देणाऱ्या गाडीवर दंड ठोठावला आहे.
अरविंद केजरीवाल यांची प्रकृती ढासळली, रक्तातील साखर कमी झाल्याची माहिती
अरविंद केजरीवाल यांची प्रकृती ढासळली, रक्तातील साखर कमी झाल्याची माहिती
बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे अमेरिकेत राज ठाकरेंची खास मुलाखत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. 28 तारखेला राज ठाकरे यांची बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे अमेरिकेत मुलाखत होणार आहे. अमेरिकेत पोहचल्यानंतर राज ठाकरे यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं.
सिंधुदुर्ग-कोकण पदवीधर निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ वाजेपर्यंत 7.25% मतदान
सिंधुदुर्ग-कोकण पदवीधर निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ वाजेपर्यंत 7.25% मतदान
ओम बिरला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड...
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रस्ताव पंतप्रधानांसह खासदारांनी ठेवला..
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रस्ताव पंतप्रधानांसह खासदारांनी ठेवला..
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या अवैध बांधकामावर हातोडा
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या अवैध बांधकामावर हातोडा
मुंबईत पुढील 2 दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट
हवामान विभागाकडून पुढील दोन ते चार दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केल्यानंतरही 25 जून रोजी मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला. मंगळवारी 25 जून रोजी मुंबईतील सांताक्रूझमध्ये कमाल तापमान 36.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आले आहेत. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार आणि गुरुवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाऊस रुसला; कापूस, सोयाबीन, धान संकटात
पाऊस रुसला; कापूस, सोयाबीन, धान संकटात
चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. प्रारंभिक पावसानंतर लगेच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, मागील आठ दहा दिवसांपासून पाऊसच नसल्यानं पेरणी वाया गेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवलं आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मुंबई महापालिकेला देण्यास अखेरीस मंजुरी
वरळीतल्या महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मुंबई महापालिकेला देण्यासाठी अखेरीस मंजुरी मिळाली असून रेसकोर्सवर आता सेंट्रल पार्क आणि थिम पार्क होणार आहे. मात्र त्यामध्ये बदल करण्यासाठी लोकांशी संवाद साधून आणि त्यांची मतं जाणून घेणार आहे. सरकार तिथे इमारती उभारणार होते. मात्र आता तिथे पालिकेतर्फे झाडं उभी केली जाणार आहेत आणि जास्तीत जास्त पाऊस कसा पडेल याची काळजी घेतली जाणार आहे. जो सेंट्रल पार्क उभा केला जाणार आहे, तिथे इमारती न उभारता ओपन स्पेस ठेवला जाणार आहे.
आवक घटल्याने भाज्यांचे भाव कडाडले
भाजीपाल्यांची आवक घटल्याने भाज्यांचे भाव वाढले
हिंगोलीच्या भाजी मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे कुटुंबाचं आर्थिक गणित कोलमडलय. अनेक भाज्यांची किंमत 100 ते 120 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. कोथंबीरीचा दर जवळपास एका जुडीला 80 ते 100 रुपये मोजावा लागत आहे. श्रावण महिना येईपर्यंत भाज्यांची अशीच भाव वाढ राहणार असल्याचं भाजी विक्रेत्यांकडून सांगितलं जात आहे.
चालकाचं नियंत्रण सुटल्याने शाळेची बस थेट मेडिकलमध्ये
मीरा रोडमध्ये पूनम सागर कॉम्प्लेक्स मधील पुनम सागर मेडिकल येथे हा प्रकार घडला. सलूनमधील न्हाव्याने स्कूल बस चालकाकडे गाडीचा राऊंड मारण्यासाठी चावी मागितली होती. सुदैवाने मेडिकलमध्ये ग्राहक नसल्याने जीवितहानी टळली. मेडिकल चालक सुनील गुप्ता सुदैवाने बचावले. सोमवारी संध्याकाळी साडेआठ वाजताच्या सुमाराची ही घटना घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
कोकण पदवीधर मतदार संघाच्या मतदानाची प्रक्रिया सुरू
सकाळी सात वाजता कोकण पदवीधर मतदार संघाच्या मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश किर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पत्नीसह डोंबिवलीतील मतदान केंद्रावर दाखल झाले. मंत्री चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला .