राहूल तपासे, प्रतिनिधी
Satara Shanbhag School News Today : सातारा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे.साताऱ्यातील नामांकित शानबाग शाळेत क्लोरीन गॅसचा सिलेंडर लीक झाल्याने एकच खळबळ उडाली. स्विमिंग पूलच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरीन गॅसची गळती झाल्यानंतर शाळेच्या परिसरात तीव्र वास पसरला आणि अनेक विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.काही विद्यार्थी गुदमरल्याने शाळा प्रशासनाचीही धावपळ उडाली.
तीन विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
प्राथमिक माहितीनुसार या घटनेत तीन विद्यार्थिनींची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना काही शिक्षकांनाही क्लोरीन गॅसची बाधा झाली असून त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नक्की वाचा >> Kolhapur News: कोल्हापूर शहरात थरार! भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, हल्ल्यामागचं कारण काय?
इतर विद्यार्थ्यांना सुरक्षीत ठिकाणी हलवलं
घटनेची माहिती मिळताच पोलीस,अग्निशमन दल आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.रिसर सुरक्षित करण्यात आला असून गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.दरम्यान,शाळेतील इतर विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांच्या आरोग्याची तपासणी सुरू आहे.
नक्की वाचा >> Dhule News: व्हिडीओ बनवून तापी नदीच्या पुलावरून तरुणाने मारली उडी, दोन दिवसांनी जे घडलं..
स्विमिंग पूलच्या देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनामुळे अशी गंभीर घटना घडल्याने शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गॅस गळती नेमकी कशामुळे झाली,सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि या घटनेला जबाबदार कोण,याचा तपास प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.