जाहिरात

Dhule News: व्हिडीओ बनवून तापी नदीच्या पुलावरून तरुणाने मारली उडी, दोन दिवसांनी जे घडलं..

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे.तापी नदीवरील गिधाडे पुलावर आत्महत्या करण्यापूर्वी एका तरुणाने व्हिडिओ बनवला होता.

Dhule News: व्हिडीओ बनवून तापी नदीच्या पुलावरून तरुणाने मारली उडी, दोन दिवसांनी जे घडलं..
Dhule Shirpur Suicide Case

नागिंद मोरे, प्रतिनिधी 

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे.तापी नदीवरील गिधाडे पुलावर आत्महत्या करण्यापूर्वी एका तरुणाने व्हिडिओ बनवला होता. या 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी तापी नदीपात्रात आढळला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने काही व्यक्ती आणि कंपनीवर गंभीर आरोप केले होते.दरम्यान,या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील संदीप उदेसिंग गिरासेनं दोन दिवसांपूर्वी गिधाडे येथील तापी नदी पुलावरून आत्महत्या केल्याचा संशय आहे.आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसारित केला होता. व्हिडिओमध्ये आपण ज्या आरना कंपनीत काम करत होतो,तेथे आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा संदीपने केला आहे.तसेच काही व्यक्ती आपल्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोपही त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून केला.या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

नक्की वाचा >> ST Bus News : वाढत्या डिझेल दरांच्या पार्श्वभूमीवर MSRTC चा मोठा निर्णय, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

तापी नदीपात्रात सलग दोन दिवस शोधमोहीम राबवली अन्..

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गिधाडे येथील तापी पुलावर पोलिसांनी शोध घेतला असता,संदीपचा मोबाईल,मोटारसायकल आणि चप्पल पुलावर आढळून आली.त्यानंतर पोलीस,आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी तापी नदीपात्रात सलग दोन दिवस शोधमोहीम राबवली.अखेर आज सकाळी तापी नदीपात्रात संदीप गिरासे याचा मृतदेह आढळून आला.मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.तसेच व्हिडिओमधील आरोपांच्या अनुषंगानेही तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com