जाहिरात

नेत्यांचे निकटवर्तीय राजकारणात वाटा शोधताना, देवेंद्र फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकही आमदारकीच्या वाटेवर!

गेल्या काही कालावधीमध्ये राजकीय नेत्यांचे स्वीय सहाय्यक, खाजगी सचिव तसेच वरिष्ठ सनदी अधिकारी राजकारणात पाऊल टाकत नव्या वाटा शोधत आहेत.

नेत्यांचे निकटवर्तीय राजकारणात वाटा शोधताना, देवेंद्र फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकही आमदारकीच्या वाटेवर!
मुंबई:

राजकीय नेत्यांचे कुटुंबीय राजकारणात येणं किंवा निवडणूक लढवलं महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. गेल्या काही कालावधीमध्ये राजकीय नेत्यांचे स्वीय सहाय्यक, खाजगी सचिव तसेच वरिष्ठ सनदी अधिकारी राजकारणात पाऊल टाकत नव्या वाटा शोधत आहेत. भाजपाच्या नुकत्याच झालेल्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन स्वीय सहाय्यक आमदारकीची तयारी करताना दिसत आहेत. 2019 साली अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभेतून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते. आता परत एकदा ते औसातून उभे राहिले आहेत. तसेच फडणवीस यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक असणारे सुमित वानखेडे यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. 

विद्यमान आमदार दादाराव केचे यांचे तिकीट कापत सुमीत वानखडे यांनी तिकीट मिळवले आहे. वर्ध्याचा आर्वी विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे आर्वी विधानसभेत महायुतीतून सुमीत वानखडे आणि मविआतून मयुरा काळे अशी लढत पाहायला मिळणार आहे.  

Bandra East Vidhan Sabha : वांद्रे पूर्व मतदारसंघाला बंडखोरीचं ग्रहण, पाच उमेदवारांमध्ये होणार जंगी लढत?

नक्की वाचा - Bandra East Vidhan Sabha : वांद्रे पूर्व मतदारसंघाला बंडखोरीचं ग्रहण, पाच उमेदवारांमध्ये होणार जंगी लढत?

यापूर्वीच अभिमन्यू पवार यांनी एकदा आमदारकी लढवली होती. आता सुमीत वानखडे स्वतःचं नशीब आजमावू पाहत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव राहिलेले खतगावकर यांनी सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली होती. पण तिकीट न मिळाल्याने तूर्तास खतगावकर निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे फक्त स्वीय सहाय्यकच नाही तर वरिष्ठ आयएएस निवृत्त झालेले अधिकारी सुद्धा निवडणूक लढू पाहत होते. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातारा जिल्ह्यात मान खटाव येथील प्रभाकर देशमुख निवृत्तीनंतर राजकारणात सक्रिय झाले. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून देशमुख यांची ओळख आहे. 2019 मध्ये देशमुख यांनी मानमधून निवडणूक देखील लढवली होती. यंदा परत एकदा तिकीट मिळवण्यासाठी प्रभाकर देशमुखांकडून जोरदार लॉबिंग करण्यात आली होती. परंतू पदरी निराशा पडली.  

शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले तरी तिकीट कापलं, आयुष्य संपवण्याची भाषा करणारे वनगा 12 तासांपासून बेपत्ता!

नक्की वाचा - शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले तरी तिकीट कापलं, आयुष्य संपवण्याची भाषा करणारे वनगा 12 तासांपासून बेपत्ता!

शरद पवार यांनी देशमुख यांच्या ऐवजी दुसऱ्यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे यांनी देखील निवडणुकीची तयारी म्हणून शरद पवार यांच्या पक्षाकडून तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केले. परंतू झेंडे यांना सुद्धा तिकीट मिळालं नाही. झेंडे हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. पुरंदर विधानसभा काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसची आहे. संभाजी झेंडे यांना पक्षाकडून तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. एकेकाळी प्रशासनात उच्च पदावर असणाऱ्या झेंडे, देशमुख यांना राजकारणाचे वेध लागले आहेत. काहींच्या पदरी तिकीट मिळाले आहे तर काहींना निराशा स्वीकारावी लागली. दुसरीकडे राजकारणांचे पीए राहिलेले सुमित वानखेडे आणि अभिमन्यू पवार यांना मात्र थेट भाजपाचे अधिकृत तिकीट मिळाले आहे. राजकारणात या आधी देखील दिलीप वळसे पाटलांसारखे नेते पीए राहीले आणि कालांतराने आमदार देखील झाले, मंत्री झाले. जे सध्या निवडणूक लढणार आहेत, त्यांचे भवितव्य काय हे थोड्या दिवसात स्पष्ट होणार आहे

Listen to the latest songs, only on JioSaavn.com