प्रांजल कुलकर्णी, नाशिक: 2027 मध्ये होणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्याची तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचाही आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत महत्त्वाची माहितीही दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
त्र्यंबकेश्वर येते जाऊन मी आज पाहणी केली. त्र्यंबकेश्वरसाठी एक विकास आराखडा तयार करण्यात आले आहे.मी त्या संदर्भात बैठक देखील घेतली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आम्ही जसा नाशिकचा विकास करणार आहे तसा त्र्यंबकेश्वरचा दखील विकास करणार आहे.2 टप्प्यात ही कामे करणार आहे तसे कुंडाचे आणि मंदिरांचा देखील विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच कुंभमेळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी देखील करण्याचा विचार आहे. लवकरच या आराखड्याला मान्यता देणार आहे. नाशिकमध्ये 11 पुल आम्ही तयार करणार आहे. मोठ्या प्रमाणात रस्ते देखील तयार करण्याचा मानस आहे. उत्तरप्रदेश सरकारने ज्या प्रकारे कायदा केला त्याप्रकारे आपण देखील कायदा करणार आहोत. मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्राधिकरण च्या माध्यमातून आम्ही सर्व प्लॅन करणार आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नक्की वाचा - European T20 Premier League: अभिषेक बच्चन युरोपीयन टी-20 लीगसाठी सज्ज; 15 जुलैपासून 6 टीम भिडणार
कुंभमेळा हा सगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करू. हा आस्थाचा महा कुंभ होईल , टेक्निकली महाकुंभ होईल. इथले प्रशासकीय टीम सक्षम आहे. सर्व लोक काम करतात. प्रयागराजचा अनुभव पाहता मी तिथे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत पण संवाद साधला, त्या ठिकाणी 18 तास ड्युटी करत होते कोणी कंप्लेंट करत नव्हतं ते म्हणत होते आम्हला कुंभाने ताकद दिली. नाशिक आणि महाराष्ट्राचे युवा या कुंभमेळ्यात जोडले गेले पाहिजे , वेगळ्या पद्धतीने ते जोडले गेले पाहिजे.. असाही विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.