राज्यात मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता कायम राहिली. पण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची अदलाबदल झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार हे दुसरे उपमुख्यमंत्री अजूनही कायम आहे. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार तसंच खातेवाटपही पूर्ण झालंय.
राज्य सरकारचा कारभार सुरु झालाय. नव्या वर्षात प्रशासकीय सोयीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांनी काही प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या अधिकाऱ्यांची झाली बदली?
पुणे जिल्हाधिकारी पदावर साताऱ्याचे जिल्हाधिकारी असलेले जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, संतोष पाटील आता साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी असतील. पुण्याचे सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचं प्रमोशन झालं आहे. दिवसे यांची जमावबंदी आयुक्त आणि संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
मिलींद म्हैसकर यांची बदली आता महसुल वन अप्पर मुख्य सचिव पदावर केली तर आरोग्य अप्पर मुख्य सचिव पदावर डाॅ निपून विनायक यांची बदली करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची आता कृषी व पदुम प्रधान सचिव या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विणुगोपाल रेड्डी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
एच. एस. सोनावणे यांची क्रीडा व युवक सेवा आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. हर्षदीप कांबळे यांची प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात बदली करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )
आय. ए. कुंदन यांची आता प्रधान सचिव ऊर्जा उद्योग व कामगार विभागात बदली झाली असून अर्जित सिंह देवल यांना यांची आधीच शालेय शिक्षण ओके जवळ भागात प्रधान सचिव पदावर नियुक्ती केली आहे. विनिता वैद सिंगल यांची पर्यावरण व वातावरणीय बदल विभागात प्रधान सचिव पदावर बदली झाली आहे.
मुंडे बंधू-भगिनींना दिलासा
कॅबिनेट मंत्र्यांना त्यांनी यापूर्वी सोबत काम केलेल्या अधिकारीच सचिव म्हणून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे. मंत्री आणि सचिव यांच्यात समन्वय राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना यामध्ये दिलासा मिळाला आहे.
पंकजा मुंडे महिला आणि बालकल्याण विकास मंत्री होत्या त्यावेळी विनिता वैद सिंगल यांनी पंकजांसोबत सचिव म्हणून काम केलं होतं. आता सिंगल यांच्याकडं पंकजा यांच्या पर्यावरण खात्याच्या सचिव पदाची जबादारी देण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना जयश्री भोज त्या खात्याच्या सचिव होत्या. आता त्यांना पुन्हा एकदा धनंजय मुंडे मंत्री असलेल्या अन्न आणि धान्य पुरवठा खात्याच्या सचिव करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : 77 वर्षात असं पहिल्यांदाच घडलं, देवेंद्र फडणवीसांनी 'करून दाखवलं' )
मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा संदेश
विकास रस्तोगी यांच्याकडे कृषी खात्यावर पदभार देण्यात आला आहे. आरोग्य खात्यात गेल्या काही काळात मोठे आरोप झाले होते. त्या खात्यामध्ये शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मारून विनायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा यंदाच्या आयएएस अधिकारी बदल्यातील मोठा संदेश मानला जात आहे. मिलिंद म्हैसकर मंुबई मनपा आयुक्त पदासाठी उत्सुक होते. पण त्यांना ही महसूल वन सचिव पदावर समाधान मानावे लागले आहे.