जाहिरात

77 वर्षात असं पहिल्यांदाच घडलं, देवेंद्र फडणवीसांनी 'करून दाखवलं'

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये दंडकारण्य झोनल कमिटीची प्रमुख आणि कुख्यात नक्षलवादी भूपतीची पत्नी ताराक्काचाही समावेश आहे.

77 वर्षात असं पहिल्यांदाच घडलं,  देवेंद्र फडणवीसांनी 'करून दाखवलं'
नागपूर:

गेल्या 77 वर्षात कधीच झाले नव्हते ते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (1st January 2025)  झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्या उपस्थितीत ही घटना घडली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदाचाही भार (Maharashtra Home Minister) आहे. त्यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोली जिल्ह्याला (Gadchiroli District) भेट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या उपस्थितीत 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.  आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये 8 महिला आणि 3 पुरुष असून यामध्ये दोन दाम्पत्य आहेत. 1 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते. छत्तीसगड सरकारने सुद्धा त्यांच्यावर बक्षिस जाहीर केले होते. 

ताराक्काच्या आत्मसमर्पणाने नक्षल चळवळीला हादरा

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये दंडकारण्य झोनल कमिटीची प्रमुख आणि कुख्यात नक्षलवादी भूपतीची पत्नी ताराक्काचाही समावेश आहे. गेली 34 वर्षे ती नक्षलवादी चळवलीत होती. तिच्याशिवाय  3 डिव्हिजन कमिटी मेंबर,1 उपकमांडर, 2 एरिया कमिटी मेंबर यांनीही आत्मसमर्पण केले. या सगळ्यांना मुख्य प्रवाहात येता यावे यासाठी 86 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. 

24 मध्ये 24 नक्षल्यांचा खात्मा

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षात एकूण 24 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. यातील 5 नक्षलवादी हे निवडणूक आचारसंहितेच्या काळात ठार मारण्यात आले. 2024मध्ये 18 माओवाद्यांना अटक करण्यात आली होती. गेल्या 6 महिन्यात 16 जहाल नक्षलवादी आणि 1 जानेवारी 2025 रोजी 11 असे एकूण 27 जण मुख्य प्रवाहात आले आहेत.उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या 4 वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादात सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे  .त्यांनी म्हटले की, "आता संविधानविरोधी चळवळीत कुणीही जायला तयार नाही, ही आनंदाची बाब आहे. न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळेल" 

77 वर्षांत पहिल्यांदाच 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे उद्घाटन केले. अतिदुर्गम भागात पोहोचलेले देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेला सुरुवात झाली असून मुख्यमंत्र्यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवला. इतकेच नाही तर त्यांनी या बसने देखील प्रवास केला. 

कोनसरी येथे लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथे लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यात कोनसरी येथे डीआयआय प्लांट (400 कोटी रुपये गुंतवणूक, 700 रोजगार), पेलेट प्लांट आणि स्लरी पाईपलाईन (3000 कोटी रुपये गुंतवणूक, 1000 रोजगार), हेडरी, एटापल्ली येथे आयर्न ओअर ग्राईडिंग प्लांट (2700 कोटी रुपये गुंतवणूक, 1500 रोजगार), वन्या गारमेंट युनिट (20 कोटी रुपये गुंतवणूक, 600 रोजगार) याचा समावेश आहे. याशिवाय लॉईडस काली अम्मल हॉस्पीटल आणि लॉईडस राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सुमारे 1200 विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थाने, जिमखाना, बालोद्यान इत्यादींचेही लोकार्पण करण्यात आले. कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे शेअर्स प्रदान करुन एकप्रकारे मालकी देण्याचाही निर्णय लॉईड्सने घेतला होता. या शेअर्सचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com