पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM शिंदेंचे मोठे पाऊल, पोलीस आयुक्तांना दिले हे निर्देश

पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे पाऊल उचलले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करावी तसेच अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.

पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (24 जून) पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले. पुणे शहरातील बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात नव्याने कठोर कारवाई सुरू करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

(नक्की वाचा: पुण्यात चाललंय काय ! सांस्कृतिक राजधानीला पडलाय ड्रग्जचा विळखा)

पुण्याच्या पबमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल  

पुण्यातील एफसी रोडवरील एका पबच्या स्वच्छतागृहात काही युवक अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा पब मालक-चालक आणि ड्रग्जचा मुद्दा चर्चेत आला आहे. फर्ग्युसन रोडवरील एका नामांकित हॉटलेमधून ड्रग्ज घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या पार्टीमध्ये काही तरुण स्वच्छतागृहामध्ये अमली पदार्थ घेत असल्याचे दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, पार्टीसाठी कोणतीही वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती. या पार्टीमध्ये काही तरुण टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेत असल्याचे आढळले तर यादरम्यान अल्पवयीन मुलांना दारूही पुरवली जात होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बारमालक, डीजेसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

( नक्की वाचा : पुण्यातील स्टिंग ऑपरेशननंतर 'तो' पब सील, 8 जणांविरोधात कारवाई; दोघे निलंबित )

स्टिंग ऑपरेशनमुळे सत्य समोर

पुणे शहरात रात्री उशीरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन समोर आले होते. एफसी रोडवरील L3 - Liquid Leisure Lounge हॉटेलमध्ये शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पार्टी सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचेही निलंबन करण्यात आले आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - पुण्यात पुन्हा 'उडता पंजाब', नामांकित हॉटेलमधील स्टिंग ऑपरेशन आलं समोर)

Puns Drugs | ड्रग्ज खुलेआम मिळणारं शहर... पुण्याची नवी ओळख

Topics mentioned in this article