जाहिरात

Kunal kamra: तुफान राड्यानंतर कुणाल कामराने पुन्हा डिवचलं, शिवसेनेसाठी नवं गाणं वाजवलं! पाहा VIDEO

Kunal kamra: तुफान राड्यानंतर कुणाल कामराने पुन्हा डिवचलं, शिवसेनेसाठी नवं गाणं वाजवलं! पाहा VIDEO

Kunal Kamra New Video: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका गाण्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर आधारित उपहासात्मक कविता केल्याने शिंदे गट आक्रमक झाला. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी कुणाल कामराचा शो झालेल्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोडही केली असून कुणाल कामराला चोप देण्याचा इशाराही दिला आहे. अशातच आता कुणाल कामराने आणखी एक व्हिडिओ ट्वीट करुन शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या विडंबनात्मक गाण्यातून मोदी सरकारसह महाराष्ट्र सरकारलाही धारेवर धरले आहे. त्याच्या उपहासात्मक कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यावरील कवितेने वाद झाल्यानंतर कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून पोलिसांनाही त्याला समन्स बजावले आहे.

अशातच आता त्याने आणखी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. 23 मार्चच्या रात्री स्टुडिओ द हॅबिटॅटवर झालेल्या तोडफोडीचा आणि त्या तोडफोडीनंतर ज्याप्रकारे जल्लोष केला, त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये "हम होंगे कंगल, हम होंगे कंगल एक दिन" हे गाणे गायलं आहे. यामध्ये 23 मार्च आणि 24 मार्चचे सर्व फुटेज लावण्यात आले आहे.

या नव्या व्हिडिओमध्ये कुणालने 23 मार्च रोजी द हॅबिटॅट या स्टुडिओची झालेली तोडफोड आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांन घातलेला राडा दाखवला आहे. हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन.. असे गीत त्याने तयार केले असून यामध्ये 23 आणि 24 तारखेला झालेल्या राड्याचे सर्व फुटेज लावण्यात आले आहेत. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राहुल कनालही दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये तो  हम होंगे कंगाल एक दिन. मन में अंधविश्वास देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन. होंगे नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों  ओर, पुलिस के पंगे चारों ओर एक दिन...मन में नथूराम और हरकतें आशाराम, हम होंगे कंगाल एक दिन. होगा गाय का प्रचार, लेके हाथों में हथियार, होगा संघ का शिष्टाचार, एक दिन...जनता बेरोजगार, गरीबी की कगार हम होंगे कंगाल एक दिन... असे उपहासात्मक गीत गाताना दिसत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Disha Salian: सालियान प्रकरणाला नवी 'दिशा', आता आदित्य ठाकरें बरोबर उद्धव ठाकरे ही अडकणार?