मविआतला मुंबईतल्या 'त्या' जागांवरचा तिढा सुटला, ठाकरेंच्या पारड्यात कोणती जागा?

महाविकास आघाडीत मुंबईतल्या काही जागांवर तोडगा निघाला नव्हता. मात्र आता त्या जागांवर एकमत झाल्याचे समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडीत मुंबईतल्या काही जागांवर तोडगा निघाला नव्हता. मात्र आता त्या जागांवर एकमत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईतल्या जवळपास सर्व जागांवर मविआमध्ये चर्चा झाली असून जागा वाटपही अंतिम झाले आहे. मुंबईतल्या वांद्र पूर्व, चांदीवली आणि भायखळा या तिन मतदार संघाबाबत एकमत होत नव्हते. मात्र आता या जागांवर तोडगा निघाला आहे. या जागा मिळाव्यात म्हणून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आग्रही होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वांद्र पूर्व विधानसभा मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गट कमालीची आग्रही होता. या मतदार संघातून युवा सेनेचे सरचिटणिस वरूण सरदेसाई निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मात्र हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे विद्यमान आमदार आहे. मात्र ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अशा वेळी हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा अशी भूमीका उद्धव ठाकरे यांची होती. तर विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्याची ची जागा या सुत्रानुसार वांद्रे पूर्व मतदार संघावर काँग्रेसने दावा केला होता. 

ट्रेंडिंग बातमी - नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे दोन ठराव, निवडणुकीच्या तोंडावर वाद चव्हाट्यावर

मात्र आता ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या पारड्यात पडली आहे. शिवसेना आपला उमेदवार या मतदार संघातून मैदानात उतरवेल. वरूण सरदेसाई हे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सध्या होत आहे. या बदल्यात शिवसेना ठाकरे गटाने चांदीवलीची जागा काँग्रेसला दिली आहे. चांदिवलीतून काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री नसिम खान निवडणूक लढणार आहे. या मतदार संघात दिलीप लांडे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. त्यामुळे ही जागा ठाकरे गटाने काँग्रेसला दिली आहे.   

ट्रेंडिंग बातमी - हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसणार, भाजपने फासे टाकले, बडा नेता गळाला

वांद्रे पूर्वच्या बदल्यात चांदिवलीची जागा काँग्रेसने पदरात पाडून घेतली आहे. या जागांची काँग्रेस आणि शिवसेनेत आदला बदल झाली आहे. दरम्यान भायखळा विधानसभा मतदार संघाबाबत तोडगा निघाला आहे. हा मतदार संघही शिवसेना ठाकरे गट आपल्या पदरात पाडून घेण्यास यशस्वी झाला आहे. त्यामुळे मुंबईतली जागा वाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. हे जागा वाटप आता लवकरच जाहीर केले जाणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - कराडमध्ये शस्त्राच्या धाकाने हवालाची तीन कोटींची रक्कम लुटली

राज्यात विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होत आहे. वंचित बहुजन आघाडीने ही आपले उमेदवार मैदानात उतरवले आहे. तर राज ठाकरेंची मनसेही स्वबळ आजमावत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.