पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराडजवळच्या मलकापूर हद्दीत शस्त्राच्या धाकाने कारमधील तीन कोटींची रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. सदरची रक्कम ही व्यापाऱ्याची असून ती मुंबईहून दक्षिण भारतात हवाला मार्फत नेली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हवाला मार्फत पैसे पोचविणाऱ्या कंपनीचा कारभार दक्षिण भारतातील एका मोठ्या शहरातून चालतो. या कंपनीची कार तीन कोटींची रक्कम घेऊन सोमवारी रात्री मुंबईहून दक्षिण भारतात निघाली होती. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास कार कराडमध्ये पहोचली. त्याच वेळी मलकापूर हद्दीत कारच्या समोर दुसरे वाहन आले. त्यांनी संबधीत कार अडवली. त्यानंतर पाच ते सहा जणांनी पिस्तुलांसह धारदार शस्त्रांच्या धाकाने कारमधील तीन कोटींची रक्कम लुटली. त्यानंतर ते पळून गेले.
ट्रेंडिंग बातमी - नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे दोन ठराव, निवडणुकीच्या तोंडावर वाद चव्हाट्यावर
कारमधील रक्कम लुटल्यानंतर संशयित मुंबईच्या दिशेने पळाले.त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची या प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे. यातील मुख्य सुत्रधार अद्यापही पोलासांच्या हाती लागलेला नाही. यातील सर्व संशयितांना अटक होण्याची तसेच लुटलेली रक्कम हस्तगत होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ट्रेंडिंग बातमी - हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसणार, भाजपने फासे टाकले, बडा नेता गळाला
महामार्गावर कोट्यवधीची रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर साताऱ्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर कराडमध्ये तळ ठोकून होत्या. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरिक्षक राम ताशीलदार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही तपासले आहे. त्या आधारे तपासाला गती देत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. लवकरच लुटलेली रक्कम मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world