लक्ष्मण सोळुंके, जालना: मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार, प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. गोरंट्याल भाजपाच्या पक्षप्रवेशांसाठी बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही समोर आले आहे. गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केला तर काँग्रेस पक्षाला मराठवाड्यात हा अशोकराव चव्हाण यांच्यानंतर सर्वात मोठा दुसरा झटका असणार राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल यांनीही विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केल्याची तक्रार पक्षाकडे केली होती. मात्र पक्षश्रेष्ठींकडून त्यांना अपेक्षित साथ न मिळाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तकाही दिवसांपासून गोरंट्याल हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चाना ही उधाण आलं होत. गोरंट्याल यांच्याकडून त्याबाबत दुजोरा देण्यात आला नव्हता.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असतान .जालना नगरपालिकेवर काँग्रेसचे गोरंट्याल यांच्या गटाचे वर्चस्व होते. त्यातच लवकर महापालिकेची निवडणूकही होणार असल्याने शिवसेनेच्या आमदार अर्जुन खोतकर यांना शह देण्यासाठी गोरंट्याल यांनी ही भाजपात प्रवेश करण्यासाठी भाजपातील बड्या नेत्यांच्याही संपर्कात असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून बोलल्या जात आहे
दोन दिवसांपूर्वी गोरंट्याल यांनी भाजपचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथे भेट घेतल्याची माहिती ही समोर आली आहे. त्या बैठकीत भाजप प्रवेशावर चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती ही समोर आली आहे. त्याच बरोबर अशोकराव चव्हाण,अतुल सावे, नारायण कुचे यांच्या मार्फतही गोरंट्याल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
जालना नगरपरिषदचे रूपांतर महानगर पालिकेत झाल्याने नव्याने तयार झालेल्या जालना महापालिकेची पहिलीच निवडणूक होणार आहे.महापालिकेवर आपलीच सत्ता यावी यासाठी आमदार अर्जुन खोतकर, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्याल शरतीचे प्रयन्त करातंय त्यांतच शिवसेनाच्या आमदार अर्जुन खोतकर यांना शह देण्यासाठी आणि जिल्ह्यात भाजपाची एक हाती सत्ता कायम ठेवण्यासाठी गोरंट्याल यांचा भाजपातील प्रवेश ही महत्वाचा मानला जात आहे.
सर्पमित्रांसाठी सरकार मोठा निर्णय घेणार, महसूल मंत्री बावनकुळे दिली माहिती
गोरंट्याल हे भाजपात गेले तर भाजपची ताकद वाढणार असून, अंतर्गत राजकीय विरोध असणाऱ्या पक्षाला शह देता येणार असल्याच्या चर्चाही भाजपच्या गोटात रंगल्या आहेत. दरम्यान भाजपात जाण्याच्या चर्चावरून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल यांनी आपल्या शेरो शायरीच्या अंदाजात "आईना बनने का हरजना भरना है मुझे! कब का तूट चुका हु बस अब भी करना है मुझे! अब ये बताये साधे दिल कितने इम्तिहान देना है मुझे. म्हणत काँगेस सोडण्याचे संकेत दिले आहेत