राहुल गांधी आज नाहीतर उद्या कोल्हापुरात; दौऱ्यामागचं राजकारण काय?

राहुल गांधी दोन दिवस कोल्हापुरात येणार होते. तब्बल 14 वर्षानंतरचा राहुल गांधींचा हा कोल्हापूर दौरा होता. कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, कोल्हापूर

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाला आहे. विमानात तांत्रिक अडचण झाल्यामुळे राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द केला आहे. मात्र उद्या राहुल गांधी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. उद्या सकाळी 10 वाजता राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे.  त्यानंतर नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळाला राहुल गांधी अभिवादन करतील. त्यानंतर दुपारच्या सुमारास सयाजी हॉटेल येथे संविधान सभा संमेलन होईल.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तब्बल 14 वर्षानंतरचा राहुल गांधींचा हा कोल्हापूर दौरा होत आहे.  राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संविधान मेळावा देखील पार पडणार आहे.  यामुळे लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा पुढे नेण्याचा ठरवलं आहे, हे निश्चित आहे. मात्र संविधान बचावचा मुद्दा काँग्रेसला विधानसभेला फायद्याचा ठरेल काय हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. 

(नक्की वाचा- राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले तब्बल 34 निर्णय, कुणाला होणार फायदा?)

राहुल गांधीच्या दौऱ्यामागचं राजकारण

कोल्हापुरातील पत्रकारांनी याबाबत म्हटलं की, संविधान बदलाबाबत काँग्रेस फेक नरेटिव्ह सेट करत असल्याच भाजप आणि महायुतीकडून वारंवार राज्यात सांगितलं जात आहे. मात्र आजही लोकांना शंका आहेत की भाजप सरकार हळूहळू संविधान बदलेल. या शंकेला बळकटी मिळावी यासाठी इंडिया आघाडीकडूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. संविधानाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचा वापर महाराष्ट्राच्या निवडणुकीत कसा होईल यासाठी काँग्रेसचा जास्त प्रयत्न सुरु आहे. 
 
कोल्हापुरात संविधान मेळावा पार पडणार आहे. याचं कारण असं आहे की, कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची पुरोगामी नगरी आहे. दुसरं वैशिष्ट म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची 150 व्या जयंतीचं हे वर्ष आहे. संविधान बदल, आरक्षण रद्द याबाबचा संदेश संपूर्ण राज्यात जावा असा प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहे, असं मत कोल्हापुरातील स्थानिक पत्रकारांनी मांडलं. 

( नक्की वाचा : ब्राह्मण उमेदवाराची मागणी, संघाचा विरोध; डोंबिवलीचा गड रविंद्र चव्हाण कसा राखणार? )

सतेज पाटलांचे मंत्रिपदासाठी प्रयत्न

कोल्हापुरात सध्या काँग्रेसच 4 विधानसभेचे तर विधानपरिषदेचे दोन आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जास्तीतजास्त आमदार जिंकून आणण्याचा सतेज पाटलांचा प्रयत्न असणार आहे. जास्त आमदारांच्या जोरावर सत्ता आल्यास कॅबिनेट मंत्रिपद मिळवण्याच सतेज पाटलांचा प्रयत्न आहे, असं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं

पाहा VIDEO

Topics mentioned in this article