नागपूर: नागपूर महानगरपालिकेवर तीन वर्षे प्रशासकाचे राज्य आहे. मात्र, या कालावधीत खरे राज्य दलालांचे असून सामान्य जनता त्रस्त झाल्याचा घणाघाती आरोप पश्चिम नागपूर येथील आमदार, माजी महापौर आणि काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आहे. नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुका समोर असताना ठाकरे यांनी अलीकडेच महानगर पालिकेच्या मुख्यालयावर आक्रमक मोर्चा काढला होता. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी रवी भवन सभागृहात मोबाईल फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवून सर्व उपस्थितांना धक्का दिला.
नेमकं काय घडलं?
संभाषणातील व्यक्ती आपण मोठ्या मोठ्या लोकांची कामे सहज करून दिल्याचे सांगतो. टाऊन प्लॅनिंग, फायर एन ओ सी अशा स्वरूपाची कोणतेही काम असेल ते होईल, थोडा वेळ लागू शकतो, मात्र होणार हे शंभर टक्के, अशा आशयाचे विधान करताना ऐकू येतो. सदर व्यक्ती दलाल असून माझ्या मतदारसंघातील एका व्यक्तीला त्याचे काम होत नव्हते म्हणून एक अधिकाऱ्यानेच या दलालकडे पाठवले आणि सदर व्यक्तीचे पैसे घेऊन सुद्धा या दलालाने काम केलेले नाही, असा आरोप ठाकरे यांनी केला.
आपण आता ही ऑडिओ क्लीप पोलिसांना देऊन या व्यक्तीच्या नावासहीत पोलिसांत तक्रार करत असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यक्तीने कोणकोणत्या मोठ्या लोकांची कामे केली, ती नियमांत बसणारी होती का, होण्यासारखी होती का याचा कसून तपास पोलिसांनी करावा, असा आग्रह करणार असल्याचे आमदार ठाकरे म्हणाले.
तसेच प्लॅन कितीही बरोबर असला तरीही दलालकडे गेल्याशिवाय सेंक्शन होत नाही. स्वतः महानगर पालिका अधिकारीच अर्जदारांना दलालाकडे पाठवतात अनुभवांच्या मार्फत पैसे घेत असावेत, फायर सेफ्टीचे NOC देण्यासाठी पैसे मागितले जातात. महानगर पालिकेच्या सर्व क्षेत्रात दलालांचे राज्य आहे आणि याची माहिती जर आयुक्तांना नसेल तर आश्चर्य आहे आणि असेल तरी आश्चर्य आहे. याशिवाय, स्वतः आयुक्त देखील मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांनी काहीं उदाहरणे देत सामान्य जनतेवर अत्याचार होत असून जनतेच्या पाठीशी कुणीही नाही, असा घणाघात त्यांनी केला.
काय आहेत ठाकरेंचे आरोप?
उत्तर नागपुरातील नारा भागात डॉ आंबेडकर पार्क होण्यासाठी दर रोज आंदोलन सुरू आहे. त्याचा जनतेला उपद्रव नसताना 3 दिवस आधी महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाचे हरीश राऊत यांनी सकाळी 6 वाजता पोलिस आणि बुलडोझर नेऊन ते आंदोलन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पंचशील झंडा तोडला. त्या मागे कोणी बिल्डर आहे काय? जागेवर पार्कचे आरक्षण होते. शासनाने पार्क करिता आरक्षित करून ठेवली होती. मग, असे काय आणीबाणीचे प्रकार घडले की महापालिका आयुक्तांनी तिथे सकाळी सहा वाजता बुलडोझर पाठवून नासधूस केली, असा सवाल करत त्यांनी
राज्य शासनाने प्रशासकाला जाब विचारला पाहिजे, अशी मागणी केली.
बर्डी मेनरोड वरील हॉकर्स बेरोजगार केले, कचरा संकलन करणाऱ्या BVG आणि इन्व्हायरो या कंपन्या गैरप्रकार करत आहेत, फायर NOC न घेता शहरात हॉटेल सुरू आहेत. अतिक्रमण होत आहे. अवैध वसुली करून आशीर्वाद दिले जात आहे असे आरोप केले. नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी कंत्राटदारांवर कोणाचेही नियंत्रण नाही. नव्या रस्त्यांना खोदून लाईन टाकली जात आहे.
अपेक्षित खोलवर खड्डे न करता बिले दिली. अधिकारी 5 ते 10 टक्के रक्कम घेऊन बिल साईन करून देतात. महानगर पालिकेच्या पगाराशिवाय अधिकारी खाजगी कंपन्यांच्या पे रोल वर आहेत. आयुक्त आणि अधिकारी बिल्डर मित्रांच्या सोबत क्लब मध्ये पार्ट्या करण्यात व्यस्त असून त्याचे फोटोंसह पुरावे आहेत, असे ही ते म्हणाले.
Kolhapur News: पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळाचे सौदे! किती मिळाला भाव?
जर शहरातील परिस्थिती सुधारली नाही तर येणाऱ्या काळात रोज आंदोलने होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.प्लॅन कितीही बरोबर असला तरीही दलालकडे गेल्याशिवाय सेंक्शन होत नाही. स्वतः महानगर पालिका अधिकारीच अर्जदारांना दलालाकडे पाठवतात अनुभवांच्या मार्फत पैसे घेत असावेत, फायर सेफ्टी चे NOC देण्यासाठी पैसे मागितले जातात असे ते म्हणाले.