जाहिरात

Kolhapur News: पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळाचे सौदे! किती मिळाला भाव?

या गूळ सौदा दरम्यान बाजार समितीतील पदाधिकारी, कर्मचारी आणि व्यापारी उपस्थित होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या सौद्याला गर्दी पाहायला मिळाली. 

Kolhapur News: पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळाचे सौदे! किती मिळाला भाव?

विशाल पुजारी, कोल्हापूर:

 Kolhapur jaggery Price: दिवाळीच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापुरात आज गुळाचा सौदा पार पडला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार पडलेल्या या सौद्यामध्ये गुळाला 4500 रुपये इतका भाव मिळाला. या गूळ सौदा दरम्यान बाजार समितीतील पदाधिकारी, कर्मचारी आणि व्यापारी उपस्थित होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या सौद्याला गर्दी पाहायला मिळाली. 

गुळाला किती मिळाला भाव? 

 कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळ व्यापार पेठेत सौद्याची तयारी करण्यात आलेली. यंदाचा सौदा अमर पाटील यांच्या ज्योतिर्लिंग अडत दुकान या ठिकाणी पार पडला.  या सौद्यासाठी गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ हे उपस्थित होते. त्यांच्यासह बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, इतर पदाधिकारी, व्यापारी आणि कर्मचारी हे मोठ्या संख्येने हजर होते. 

नाविद मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत आडत व्यापारी अमर पाटील यांच्यासह इतर काही मंडळींनी हा सौदा सुरू केला. यातूनच यंदा 4500 रुपये इतका भाव जाहीर झाला. लिलाव पद्धतीतून हा दर जाहीर केला जातोआज (22 ऑक्टोबर) सकाळी 9:30 च्या सुमारास सौद्याला सुरुवात झाली. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सध्याचा आनंद साजरा करण्यात आला. सौद्याच्यावेळी बाजार समितीचे सुरक्षारक्षकही संपूर्ण परिसरामध्ये लक्ष ठेवून होते. दरम्यान सौद्यासाठी आलेल्या नेते, पदाधिकारी, शेतकरी, गुराळघर मालक, व्यापारी, कर्मचारी यांच्यासाठी नाश्तापाण्याची देखील सोय करण्यात आलेली. 

दिवसा ऊन, रात्री गारवा! ऑक्टोबर हिटमुळे आजार वाढले; कशी घ्याल काळजी?

 गूळ उत्पादक शेतकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिळालेला भाव हा थोडाफार चांगला आहे. मात्र गुळाकडे ज्या पद्धतीने व्यवसाय वृद्धी म्हणून पाहिलं जातं ते सध्या झालं नसल्याचे दिसून येतं. अनेक कारणं याला आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे  कमी होत आहे. गुळाला दर मिळत नसल्यामुळे आवक कमी होत आहे. यंदा मिळालेला 4500 इतका भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडा फारच जास्त आहे. गेल्या वर्षी 4000 ते 4700  इतका भाव होता. यंदा हाच भाव 4500 रुपये आहे. पुढचं वर्षभर हा भाव टिकून राहावा अशीच गूळ उत्पादकांची अपेक्षा आहे. 

 गुळाचा सौदा कसा असतो?

 गुळ व्यापारी शिवगोंडा सदलगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षातून दोन वेळा गुळाची सौदे पार पडत असतात. गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा हे या सौद्यांचे मुहूर्त आहेत. गुळाच्या गुणवत्तेनुसार दर ठरवले जात असतात. मुहूर्तावर गुळावर लीलाव पद्धतीने दर मागितला जातो. त्यानंतर हा दर निश्चित केला जातो. यंदाचा मिळालेला भाव हा चांगला आहे. तसेच यंदा ऊसाची उंची हवी तितकी झालेली नाही. त्यामुळे याचा परिणाम गुळाच्या आवकवर होणार आहे. त्यामुळे गुळाचे दर हे स्थिर राहतील असं प्राथमिक स्वरूपात वाटतं.

Accident News: अमरावतीत हिट अँड रनचा थरार, भरधावकारने दोन तरुणींना उडवलं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com