जाहिरात

Prema Patil : 3 मुलींचा मानसिक छळ प्रकरणी चर्चेत, सौंदर्य स्पर्धेच्या विजेत्या API प्रेमा पाटलांची पदोन्नती

पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तीन तरुणींना (Pune Kothrud News) मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि त्यांचा मानसिक छळ केल्या प्रकरणी चर्चेत असलेल्या API प्रेमा पाटील यांची पदोन्नती झाल्याची माहिती आहे.

Prema Patil : 3 मुलींचा मानसिक छळ प्रकरणी चर्चेत, सौंदर्य स्पर्धेच्या विजेत्या API प्रेमा पाटलांची पदोन्नती

Prema Patil's Promotion : पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तीन तरुणींना (Pune Kothrud News) मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि त्यांचा मानसिक छळ केल्या प्रकरणी चर्चेत असलेल्या API प्रेमा पाटील यांची पदोन्नती झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका बेपत्ता झालेल्या महिलेच्या चौकशीप्रकरणी आणलेल्या तीन तरुणींसोबत प्रेमा पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मुलींना जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, तुमच्या जातीच्या मुली अशाच असतात, तुमचा खून होईल यासह अनेक घाणेरड्या कमेंट केल्या होत्या, असा आरोप मुलींकडून करण्यात आला आहे. 

अमली विरोधी टास्क फोर्समध्ये नियुक्ती

एपीआय असलेल्या प्रेमा पाटील यांची आता पदोन्नती करण्यात आली असून अमली विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने राज्यभरात मोठी चर्चा आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रेमा पाटील यांची अमली विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याचं जाहीर केलं.  

Beed News: मैत्रिणीच्या घरी राहायला गेली अन् घात झाला? महिला होमगार्डची निर्घृण हत्या

नक्की वाचा - Beed News: मैत्रिणीच्या घरी राहायला गेली अन् घात झाला? महिला होमगार्डची निर्घृण हत्या

काही दिवसांपूर्वी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तीन तरुणींना चौकशी करताना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप त्या पीडित मुलींनी केला होता. धक्कादायक म्हणजे त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली जात नव्हती. यावेळी रोहित पवार, प्रकाश आंबेडकर यांनी मध्यस्थी करीत पोलिसांना तक्रार नोंदवून घेण्यास भाग पाडले. मात्र तपासादरम्यान असं काही झालं नसल्याचं निष्पन्न झालं होतं. 

सौंदर्य स्पर्धेत विजयी

प्रेमा पाटील या सांगलीतील पलूसजवळील पुणदी या गावच्या आहेत. प्रेमा पाटील मध्यमवर्गीत कुटुंबातून आल्या आहेत. त्यांचं एमएपर्यंतचं शिक्षण झालं असून त्यादरम्यान पाटील स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होत्या. एमकॉम आणि स्पर्धा परीक्षेचा निकाल एकाच दिवशी लागला आणि त्या अधिकारी झाल्या. पाटील या २०११ साली सेवेत दाखल झाल्या. यानंतर त्यांनी २०१९ मध्ये एका सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाल्या आणि रनिंग मिसेस इंडियाचा किताब पटकावला. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. ब्यूटी विथ ब्रेन अशीही त्यांची ओळख आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com