Coronavirus : देशभरात कोरोनाचे 4,300 हून अधिक रुग्ण, चौथ्या लाटेची चर्चा; मात्र आकडे काय सांगतात?

India Covid-19 Report: रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. चौथ्या लाटेचीही चर्चा होत आहे. मात्र याच आकड्यांना लक्षात घेतलं तर परिस्थिती टेन्शन वाढवणारी नाही. 

जाहिरात
Read Time: 2 mins

देशभरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आज ४३०२ पर्यंत पोहोचली आहे. १९मे रोजी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या २५७ होती. २६ मे रोजी ही संख्या १०१० पर्यंत पोहोचली. ३१ मे रोजी तीन हजाराचा आकडा पार करीत ही संख्या ३३९५ पर्यंत पोहोचली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. चौथ्या लाटेचीही चर्चा होत आहे. मात्र याच आकड्यांना लक्षात घेतलं तर परिस्थिती टेन्शन वाढवणारी नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

३० मे रोजी भारतात कोरोनाचे एकूण २७१० सक्रिय रुग्ण होते, जे ३१ मे रोजी ३३९५ पर्यंत वाढले. म्हणजेच २५ टक्के वाढ. १ जून रोजी कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर ११ टक्क्यांपर्यंत कमी झाला. ४ जून रोजी हा आकडा सुमारे ७ टक्क्यांपर्यंत होता. कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर झपाट्याने कमी झाला आहे हे स्पष्ट आहे.

Advertisement

Add image caption here

भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहे. केरळमध्ये २ जून रोजी सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १४३५ पर्यंत पोहोचली आहे. हा आकडा ४ जूनपर्यंत १३७५ पर्यंत घसरला आहे. केरळमध्ये ३१ मे रोजी कोरोनाचे सक्रिय रुग्ण १६ टक्क्यांहून अधिक आहे. १ जून रोजी कोरोना केस वाढण्याची गती ५ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. म्हणजेच ४ जून रोजी निगेटिव्ह ग्रोथ पाहायला मिळत आहे आणि हा आकडा -३ टक्क्यांपर्यंत आहे.  

सद्यस्थितीत देशात केरळ, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. सध्या महाराष्ट्रात ५१० कोरोना रुग्ण आहेत. ३१ मे रोजी महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली. १ जून रोजी कोरोना रुग्णवाढीचा दर ४ टक्क्यांपेक्षा कमी झाला. ४ जून रोजी हा आकडा ३% पर्यंत कमी झाला आहे.

Topics mentioned in this article