सुनील दवांगे, अहिल्यानगर
एटीएममध्ये चोरी करुन नागरिकांना लुटणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी फेविक्विकचा वापर करून एमटीएम कार्ड चोरून नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारत असे. दीपक सोनी असं आरोपीचं नाव असून तो मध्यप्रदेशमधील भोपाळचा रहिवाशी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहाता शहरात एसबीआय बँकेच्या एमटीएममध्ये एका महिलेला फसवत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 69 एटीएम कार्ड आणि फेविक्विक ताब्यात घेतलं आहे.
(नक्की वाचा- धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची 2 कारणे दिली, एक कारण ऐकून दमानियांचा संताप)
राहाता शहरात काही दिवसापूर्वी एमटीएमची आदलाबदली करून पैसे काढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी सदर एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एक व्यक्ती एटीएम बदलत असल्याचं निदर्शनास आले होते. मात्र त्याचा तपास लागत नव्हता. सोमवारी पुन्हा तोच व्यक्ती त्या एटीएममध्ये आला असता फसवणूक करत असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर महिलेला घडलेला प्रकार सांगितलं तेव्हा आरोपीला पकडण्यात आलं.
आरोपीकडे तब्बल 69 एटीएम कार्ड, आयफोन आणि फेविक्विक असे मिळून आले. संबंधित एसबीआय एटीएममध्ये त्याने फेविक्वीकचा वापर केल्याच देखील निष्पन्न झाले आहे.
(नक्की वाचा- संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)
कशी होती चोरीची पद्धत?
आरोपी दीपक सोनी गर्दीचं एटीएम शोधून ठेवत असे, त्यानंतर तेथे सुरक्षारक्षक आहे की नाही याची खात्री करत असे. त्यानंतर तिथे ग्राहक बनून जात आणि एटीएम टाकण्याच्या जागी फेविक्विक लावत असे. पैसे काढण्यासाठी कुणी आले तर त्यांचे एटीएम कार्ड चिकटून जायचे. यावेळी हा भामटा तिथे मदत करण्यासाठी जात आणि संबंधित व्यक्तीचा पीन समजून घ्यायचा. त्यानंतर त्या व्यक्तीला आपल्याकडील त्याच बॅकेचे असलेले दुसरे एटीएम कार्ड देत असे. यानंतर त्या व्यक्तीच्या खात्यातून मोठी रक्कम काढून घेत असे.