
सुनील महाडेश्वर, मुंबई: सहार एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये कार्यरत असलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधीक्षकाला ₹10.20 लाखांची लाच स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई 2 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आली. या मोठ्या कारवाईने प्रशासकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
ED अधिकाऱ्यांना रोखणाऱ्या माजी आयुक्तांची अन् पत्नीची आज चौकशी, पुरावे फ्लश केल्याचा आरोप
सीबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित अधीक्षकाने एका कस्टम हाऊस एजंट (CHA) कंपनीकडून आयात केलेल्या मालाच्या सोप्या क्लिअरन्ससाठी लाचेची मागणी केली होती. त्याने आयात मालाच्या वजनानुसार दर किलोमागे ₹10 लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. ही लाच त्याने स्वतःसाठी तसेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारीनंतरही लाच देण्यास नकार देण्यात आला असताना संबंधित अधिकाऱ्याने धमकी दिली आणि माल मुद्दाम रोखून धरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. सीबीआयने 25 जुलै 2025 ते 1 ऑगस्ट 2025 दरम्यान स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत पडताळणी केली. त्यात संबंधित अधिकाऱ्याने याआधी क्लिअर झालेल्या मालासाठी ₹6 लाख (त्यातील ₹5.80 लाख वरिष्ठांसाठी व ₹20 हजार स्वतःसाठी), तर नव्या मालाच्या क्लिअरन्ससाठी ₹10 लाखांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीमुळे गणेश मंडळांमध्ये मतभेद? कारण काय?
2 ऑगस्ट रोजी लाच घेण्याची कारवाई होत असताना सीबीआयने सापळा रचून अधीक्षकाला रंगेहात पकडले. त्याच्याकडून ₹10.20 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून 6 ऑगस्ट 2024 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world