जाहिरात

Dahi Handi 2025 Death : दहीहंडीच्या उत्साहावर काळी सावली, 2 गोविंदांचा मृत्यू, 210 जणं जखमी

दहीहंडीच्या दिवशी सकाळपासून पाऊस सुरू होता. त्यामुळे गोविंदा पथकाचा उत्साह अधिक वाढला होता.

Dahi Handi 2025 Death : दहीहंडीच्या उत्साहावर काळी सावली, 2 गोविंदांचा मृत्यू, 210 जणं जखमी

Dahi Handi 2025 Death : दहीहंडीनिमित्त मुंबईत दहीहंडीचा उत्सव शिगेला पोहोचला होता. त्यात काल 16 ऑगस्ट (Dahi Handi 2025) रोजी मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. गिरगाव, ठाणे, दादर, परळ, घाटकोपर, विरारसह उपनगरांमध्ये तब्बल शेकडो हंड्या सजवण्यात आल्या होत्या. बक्षीस रकमेची शर्यतही रंगतदार ठरल्याने काही ठिकाणी कोटीच्या घरात पारितोषिकं होती. त्यामुळे गोविंदांचा उत्साह आणखीनच वाढला होता. मात्र या उत्साहात दोन गोविंदाचा मृत्यू झाल्याने दहीहंडीला गालबोट लागलं. दरम्यान आज सकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 210 गोविंदा जखमी झाले असून 142 डिस्चार्ज तर 68 जण उपचार घेत आहेत. .

दोन गोविंदाचा मृत्यू...

मुंबईतील मानखुर्द बाल गोविंदा पथकातील गोविंदा जगमोहन शिवकिरण चौधरीचा मृत्यू झाला आहे. दहीहंडी फोडताना खाली पडल्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याशिवाय मुंबईत आणखी एका गोविंदाचा मृत्यू झाला. 14 वर्षीय रोहन वाळवी या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. रोहनला कावीळ झाली होती. मात्र त्याही अवस्थेत तो दहीहंडीसाठी पथकासोबत आला होता. तो टेम्प मध्ये बसून होता. पण अचानक चक्कर आल्याने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. 

210 हून अधिक गोविंदा जखमी l Dahi Handi injured Govinda 

जखमी गोविंदांबद्दल विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांकडून 16 ऑगस्टच्या रात्री 10 वाजेपर्यंत मिळालेली माहितीनुसार 95 गोविंदा जखमी झाले आहेत. 

सीटी रुग्णालये: जखमी 51; उपचार सुरू 32 (जीटी रुग्णालयात 1 गंभीर - नाव श्रेयस चाळके, 23 वर्षे), 19 जणांना डिस्चार्ज

ईएस रुग्णालये - जखमी 31; उपचार सुरू 5, 26 जणांना डिस्चार्ज

डब्ल्यूएस रुग्णालये - जखमी 34; उपचार सुरू 3 (बीडीबीए, कांदिवली रुग्णालयात 1 गंभीर; नाव आर्यन यादव, 9 वर्षे) 31 जणांना डिस्चार्ज

एकूण: जखमी 95; उपचार सुरू 19 (2 गंभीर); 76 जणांना डिस्चार्ज


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com