जाहिरात

गोविंदाच्या भाच्यानं घरातील गुपित उघडलं, नात्याबाबत केला मोठा खुलासा, "मामींनी मामांना चांगलंच.."

गोविंदा आणि त्याचे कुटुंबीय मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.गोविंदाची पत्नी सुनीता तिच्या धक्कादायक विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते.यावर गोविंदाने दिलेल्या रिअॅक्शनही चर्चेचा विषय ठरतात. अशातच गोंविदाच्या भाच्याने त्यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

गोविंदाच्या भाच्यानं घरातील गुपित उघडलं, नात्याबाबत केला मोठा खुलासा, "मामींनी मामांना चांगलंच.."
govinda nephew vinay anand interview

Govina-Sunita Latest News : गोविंदा आणि त्याचे कुटुंबीय मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.गोविंदाची पत्नी सुनीता तिच्या धक्कादायक विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते.यावर गोविंदाने दिलेल्या रिअॅक्शनही चर्चेचा विषय ठरतात. दुसरीकडे,गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांचे मामा-मामीसोबत असलेल्या मतभेदांबाबतही वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच गोविंदाचा दुसरा भाचा विनय आर.आनंदही प्रकाशझोतात आला आहे.  

विनय भोजपुरी चित्रपटांशी संबंधित आहेत. एकता कपूर यांच्या एसीपी विक्रांत या मालिकेनंतर तब्बल 19 वर्षांनी त्यांनी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन केले. विनयने मामा-मामींच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबतचं मौन अखेर तोडलं आहे.तसच सुनीता यांनी त्यांचा स्टार पती गोविंदांच्या अफेअरबाबत केलेल्या विधानावरही विनयने प्रतिक्रिया दिली आहे.

गोविंदाचा भाचा विनयने काय म्हटलंय?

विनय आनंदने म्हटलंय की, "तो त्याचा मामा गोंविदाच्या संपर्कात आहे. तसच तो मामी सुनीतासोबतही फोनवर बोलत असतो". विनय असंही म्हणाला, 
"पण आता थोडं भीती वाटते.कारण मामींनी मामांना चांगलंच घेरून ठेवलं आहे.मी काही बोललो तर माझीच अडचण होईल,म्हणून रिस्क घेत नाही.
जर एखादं नातं मोडण्याबाबत आधीच ठरलेलं असेल,तर मग कुणीही काही करू शकत नाही. अजूनपर्यंत ते दोघे एकत्र आहेत.म्हणजे देवाचीच इच्छा आहे.पण काहीही वाईट घडू नये.मामांनी मला सांगितलं की हा त्यांचा कठीण काळ आहे.ते देवाकडे प्रार्थना करत आहेत की हा वाईट काळ दूर व्हावा."

नक्की वाचा >> Gk News : फायटर जेटमध्ये पॅराशूट असतं, पण पॅसेंजर प्लेन किंवा प्रायव्हेट जेटमध्ये पॅराशूट का नसतं? 

‘मामा-मामी चुकीचे नाहीत'

"जेव्हा मी मामांना विचारलं की खरंच असं काही आहे का,तर त्यांनी नाही असंच सांगितलं.आता मी हेही म्हणणार नाही की माझी मामी चुकीची आहे. त्यांना काहीतरी जाणवलं असेल आणि आता त्यांना समजावू शकणारे फक्त मामा आहेत.पण मला आशा आहे की दोघांमधलं जे काही सुरू आहे ते लवकरच ठीक होईल.मामा-मामी चुकीचे नाहीत",असंही विनय म्हणाला.

गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला 39 वर्षे झाली आहेत.त्यांना दोन मुलं आहेत. ते लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. गोविंदाचा मुलगा यशवर्धन खूप लवकर बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटात यशवर्धनची हिरोईन म्हणून लापता लेडीज फेम नितांशी गोयल झळकणार आहे, अशीही सूत्रांची माहिती आहे. 

नक्की वाचा >> जगातील 5 सर्वात सुरक्षित प्रायव्हेट जेट, VVIP लोकांचाही आहे विश्वास; PM मोदी, मस्क, रोनाल्डोंचाही समावेश

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com