शरद सातपुते, सांगली
सांगलीमध्ये दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या अध्यक्षांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. उत्तम मोहिते असं खून करण्यात आलेल्या दलित महासंघाच्या अध्यक्षाचे नाव आहे. उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मुळशी पटर्न चित्रपटातील दृश्यप्रमाणे हा खून करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते. मंगळवारी त्यांचा वाढदिवस त्यांच्याच घराजवळ साजरा करण्यात येत होता. यानिमित्ताने केक कापण्याचा व जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होत. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याने उत्तम मोहिते यांच्यावर खूनी हल्ला केला.
(नक्की वाचा- Actor Govinda: अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, अचानक बेशुद्ध झाल्याने रुग्णालयात दाखल)
त्यानंतर रक्ताच्या थरोळात पडलेल्या उत्तम मोहिते यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेवेळी हल्लेखोर शेख याला संतप्त जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याच्यावरही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा- Shocking news: लिव्ह इन पार्टनरशी वाद, कारमध्ये स्वत:ला जिवंत जाळले, अंगाचा थरकाप उडवणारी घटना)
घटनेनंतर शासकीय रुग्णालय परिसरासह घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिसांना अधिक तपास सुरू केला आहे.