Actor Govinda Hospitalised : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. मिळालेल्या माहितीनुसार, डिसओरिएंटेशनमुळे गोविंदाची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक उपचारानंतर त्यांना रात्री 1 वाजता तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोविंदाचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी याबाबत माहिती दिली. सध्या गोविंदावर क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
"गोविंदाजी अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना क्रिटीकेअर रुग्णालयात नेण्यात आले. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत," असे बिंदल यांनी पीटीआयला सांगितले. परंतु त्यांच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
(नक्की वाचा- Dharmendra Health Update : चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; धर्मेंद्रच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर)
गोविंदाच्या बाबतीत अलीकडील काळात घडलेली ही पहिलीच मेडिकल इमर्जन्सी नाही. ऑक्टोबर 2024 मध्ये, घरी असताना त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने चुकून पायात गोळी झाडली गेली होती. त्यावेळी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2021 मध्ये कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world