जाहिरात

Davos 2025: दावोसमध्ये इतिहास घडला! दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रासाठी मोठे करार, गुंतवणुकीचा नेमका आकडा किती?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत.

Davos 2025: दावोसमध्ये इतिहास घडला! दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रासाठी मोठे करार, गुंतवणुकीचा नेमका आकडा किती?

Davos 2025:  दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारे हे करार आहेत. अ‍ॅमेझॉन मोठी गुंतवणूक करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत.

( नक्की वाचा : जोडप्यांमध्ये वेगानं लोकप्रिय होत असलेला Sleep Divorce काय आहे? त्याचा रिलेशनशिपवर काय परिणाम होतो? )

आज झालेले महत्त्वाचे करार!

21) सिएट
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूक : 500 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : नागपूर

22) व्हीआयटी सेमिकॉन्स
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 24,437 कोटी
रोजगार : 33,600
कोणत्या भागात : रत्नागिरी

23) टाटा समूह
क्षेत्र : बहुविध क्षेत्रात
गुंतवणूक : 30,000 कोटी

24) रुरल एन्हान्सर्स
क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक
गुंतवणूक : 10,000 कोटी

25) पॉवरिन ऊर्जा
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक: 15,299 कोटी
रोजगार : 4000

26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 15,000 कोटी
रोजगार : 1000

27) युनायटेड फॉस्परस लि.
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 6500 कोटी
रोजगार : 1300

(नक्की वाचा-  Saif Ali Khan : सैफ अली खानच्या कुटुंबीयांना धक्का, 15 हजार कोटींची संपत्ती सरकार ताब्यात घेणार!)

28) ईरुलर्निंग सोल्युशन्स
क्षेत्र : शिक्षण
गुंतवणूक: 20,000 कोटी
रोजगार : 20,000

29) ऑलेक्ट्रा ईव्ही
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूक: 3000 कोटी
रोजगार : 1000

30) फ्युएल
क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय
राज्यातील 5000 युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण
..........
दि. 21 जानेवारीपर्यंत
एकूण गुंतवणूक : 6,25,457 कोटी
एकूण रोजगार : 1,53,635
.............
दि. 22 जानेवारी रोजीचे सामंजस्य करार

32) ग्रिटा एनर्जी
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 10,319 कोटी
रोजगार : 3200
कोणत्या भागात : चंद्रपूर

33) वर्धान लिथियम
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)
गुंतवणूक : 42,535 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : नागपूर

34) इंडोरामा
क्षेत्र : वस्त्रोद्योग
गुंतवणूक : 21,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : रायगड

35) इंडोरामा
क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स
गुंतवणूक: 10,200 कोटी
रोजगार : 3000
कोणत्या भागात : रायगड

36) सॉटेफिन भारत
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक: 8641 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

37) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 43,000 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

38) सिलॉन बिव्हरेज
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 1039 कोटी
रोजगार : 450
कोणत्या भागात : अहिल्यानगर

39) लासर्न अँड टुब्रो लि.
क्षेत्र : संरक्षण उत्पादन
गुंतवणूक : 10,000 कोटी
रोजगार : 2500
कोणत्या भागात : तळेगाव

40) नेल्सन मिडिया प्रा. लि.
क्षेत्र : आयटी
गुंतवणूक: 450 कोटी
रोजगार : 1100
कोणत्या भागात : एमएमआर

41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.
क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण
गुंतवणूक : 12,780 कोटी
रोजगार : 2325
कोणत्या भागात : नागपूर

42) एमएसएन होल्डिंग्ज लि.
क्षेत्र : सौर
गुंतवणूक : 14,652 कोटी
रोजगार : 8760
कोणत्या भागात : नागपूर

43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.
क्षेत्र : ड्रोननिर्मिती
गुंतवणूक : 300 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : जालना

44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक: 5000 कोटी
रोजगार : 1300
कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र

45) हॅझेरो इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 16,000 कोटी (दोन प्रकल्प)
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : बुटीबोरी

46) टॉरल इंडिया
क्षेत्र: अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स
गुंतवणूक : 500 कोटी
रोजगार : 1200
कोणत्या भागात : अहिल्यानगर

47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 43,000 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

48) हिरानंदानी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 51,600 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

49) एव्हरस्टोन समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 8600 कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

50) अ‍ॅमेझॉन
क्षेत्र : डेटा सेंटर
गुंतवणूक : 71,795 कोटी
रोजगार : 83,100
कोणत्या भागात : एमएमआर

51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा
कोणत्या भागात : एमएमआर

52) एमटीसी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
कोणत्या भागात : एमएमआर

53) क्रॉसरेल इंटरनॅशनल
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा
कोणत्या भागात : एमएमआर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com