उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सकाळी पावणे दहाला इगतपुरीत एका रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर नाशिक शहरात ते दाखल होतील. त्यानंतर पाथर्डी गाव परिसरात लग्नसोहळ्याला हजेरी लावतील. गंगापूर रोडवरील एका हॉटेलचे उद्घाटन केल्यानंतर नाशिक राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाची आढावा बैठक घेणार आहेत. अजित पवार दौऱ्याच्या पूर्वसंध्येला छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्या असे होर्डिंग कार्यालयाबाहेर झळकल्याने या चर्चा रंगत आहेत
कीर्तनासाठी उभारलेला मंडप हवेत उडाला, 20 ते 25 जण जखमी
भोकरदन तालुक्यातील वजीरखेडा गावात यज्ञाच्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता. यासाठी मंडप उभारण्यात आला होता. मात्र हा मंडप भाविकांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली आहे. जोरदार वाऱ्याने वजीरखेडा येथील मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळलाय. या घटनेत 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. वजीरखेडा येथे महारूद्र यज्ञाच्या निमित्ताने शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आलीय. आज दुपारच्या सुमारास जोरदार वारा सुटला. आणि हा मंडप जोरदार वाऱ्यामुळे उडून भाविकांच्या अंगावर पडला. जखमींना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुणे पोलिस उद्या पाठवणार डॉ सुश्रुत घैसास यांना नोटीस
पुणे पोलिस उद्या पाठवणार डॉ सुश्रुत घैसास यांना नोटीस .डॉ सुश्रुत घैसास यांची चौकशी होणार आहे.
पुणे पोलिस नोंदवणार डॉ घैसास यांचा जबाब. डॉ घैसास यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तनिषा भिसे यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याप्रकरणी घैसास यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वेवर अनोळखी व्यक्तीने दगड मारला, चिमुकलीचा मृत्यु, सोलापूरातील घटना
- विजयपूर ते रायचूर पॅसेंजर मध्ये धक्कादायक घटना समोर
- पॅसेंजर रेल्वे गाडीत बसलेल्या चिमुकलीला दगड लागल्याने तिचा मृत्यू
- टिकेकरवाडीच्या अलीकडे काही किलोमीटरवर घडली गंभीर घटना
- आरोही अजित कांगले असे पाच वर्षीय मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव
- चिमुकलीला उपचारासाठी सोलापूर राघोजी हॉस्पिटल येथे दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
लातूरच्या चाकूर तालुक्यातील दळवेवाडी येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. केशव सिताराम होळे वय 42 वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.. केशव होळे यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे 48 हजार रुपयांचे कर्ज होते.. कर्ज परतफेडीसाठी वारंवार बँकेकडून तगादा लावण्यात येत होता. याच तगाद्याला कंटाळून केशव होळे यांनी आत्महत्या करून जीवन संपवले..
चिमुकल्याचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू
11 वर्षीय चिमुकल्याचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू झाला आहे. भाईंदर पूर्वेच्या मिरा भाईंदर स्पोर्ट क्लब मधे ही घटना घडली आहे. लाईफ गार्डच्या निष्काळजी पणा मुळे मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. रुग्णालयात स्थानिक आमदार नरेंद्र मेहता दाखल झाले होते. जो कोणी जबाबदार आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं मेहता म्हणाले. ग्रंथ हसमुख मुथा असे या चिमुकल्याचे नाव आहे.
Nashik News: येवल्यात गोरक्षकांवर हल्ला, संतप्त सकल हिंदू समाजाचा रस्ता रोको
नाशिकच्या येवल्यात जनावरांचे मास असल्याची माहिती मिळताच पाहणी करण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ल्यात गोरक्षक जखमी झाले. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी देखील यावेळी गोरक्षकांनी केली.
Pune News: दापूरच्या भिगवनमध्ये कापड दुकानाला आग
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे रात्रीच्या सुमारास एका कापड दुकानाला भीषण आग लागली.सुमारे साडेदहाच्या सुमारास लागलेल्या या आगीने अवघ्या तासाभरात संपूर्ण दुकान भस्मसात केलं.फायर ब्रिगेडने आग आटोक्यात आणली असली तरी, तोपर्यंत दुकान पूर्णपणे जळून खाक झालं होतं.
या आगीत कापड दुकानाचे वीस लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाजातून समोर आलंय.ही आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
LIVE Update: अखेर ठरलं! 22 एप्रिलला संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश
एक दोन वेळेस झालेल असल्याने कार्यकर्त्यांच खच्चीकरण झालेल आहे. पक्ष म्हणून पक्षांनी साथ दिले नाही भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राजगड कारखान्याच्या देखील अडचणी आहेत. मात्र माझ्या कारखान्याचा निधी महा युतीत मंजूर करण्यात आला असे म्हणत काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी 22 तारखेला मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.
Solapur News: डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण: आरोपी महिलेला 3 दिवसांची कोठडी
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी महिलेला तीन दिवसाची पोलिस कोठडी...
प्रकरण सेन्सिटिव्ह असल्याने पोलिसांनी मागितली तीन दिवसाची पोलिस कोठडी...
या आत्महत्या प्रकरणाशी संशयित आरोपी मनीषा मुसळे -माने यांचा संबध नाही...
एका दिवसाचा पगार कपात केल्याने डॉ. शिरीष वळसंग करांना केला होता मेल...
संशयित आरोपी महिलेच्या वकिलांचा युक्तिवाद...
या प्रकरणाचा सरकार पक्षातर्फे ऍड शिल्पा बनसोडे-सुरवसे यांनी युक्तिवाद केला तर आरोपी तर्फे प्रशांत नवगिरे काम पाहत आहेत.
पुण्यातील आंबेगाव परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकाची हत्या
LIVE Updates: शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला
- शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर आग्या मदमाशांचा हल्ला
- उष्णतेमुळे मदमाशांचा स्वभाव आक्रमक असल्याने हल्ला झाल्याचा अंदाज
- विकेंडला शिवनेरीवर पर्यटकांची गर्दी होत असताना मदमाशांनी हल्ला केला
- दिवसभर मदमाशांच्या हल्ल्याचा धोका
- जखमी पर्यटकांना उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल
- दिड महिन्यात तिसऱ्यांदा पर्यटकांवर हल्ला
- किल्ले शिवनेरीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेवर धोका..?
- वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
LIVE Update: जम्मू काश्मिरच्या रामबनमध्ये ढगफुटी, 3 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मिरच्या रामबनमध्ये ढगफुटी तसेच भुत्सलखन झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Live Update : अजित दादांचा आजचा नाशिक दौरा रद्द, हेलिकॉप्टरमध्ये झाला अचानक बिघाड
अजित दादांचा आजचा नाशिक दौरा रद्द, हेलिकॉप्टरमध्ये झाला अचानक बिघाड
LIVE Updates: अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द, हॅलिकॉप्टरमध्ये झाला बिघाड
अजित दादांचा आजचा नाशिक दौरा रद्द.. हेलिकॉप्टरमध्ये झाला अचानक बिघाड..
LIVE Updates: नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- उपचारात हलगर्जीपणा केल्याने माहेश्वरीचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांवर ठेवण्यात आला ठपका
- जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या चौकशी समितीच्या अहवालात डॉक्टर दोषी असल्याचे झाले होते निष्पन्न
- अहवालात दोषी डॉक्टरांचे नाव न देण्यात आल्याने दोषी डॉक्टरांना जिल्हा रुग्णालय प्रशासन पाठीशी घालतय का ? हा देखिल प्रश्न
- पोलीसांच्या पुढील कारवाई कडे आता लक्ष
Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच बॅनरवर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच बॅनर झळकले...
ठाण्यातील पडवळनगर परिसरात लावण्यात आला बॅनर...
उद्धव ठाकरे ,बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा खांद्यावर हात टाकलेला आठवणीला उजाळा देणारा भावनिक फोटो झळकले...
महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र..!
सध्या हा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात लागल्यामुळे राजकीय चर्चला उधाण आले आहे..
Live Update : महागड्या बुलेट चोरणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील चोरट्याला एमआयडीसी पोलिसांकडून अटक
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी महागड्या बुलेट चोरणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील चोरट्याला अजिंठा चौफुली परिसरातून अटक केली असून साजिद खान हकील खान असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या चोरट्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या दोन महागड्या बुलेटही पोलिसांनी जप्त केले आहे.
Live Update : अकोल्यात सूर्य आग ओकतोय, तापमान 44.3 अंशावर
अकोला शहरातील नेहमी गजबजलेले रस्ते आज जणू काही निर्मनुष्य झाले की काय..? अशी स्थिती दिसून येत आहे. अकोला शहरातील मुख्य मार्गावरील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत जाणारा नेहमी वर्दळीचा असलेला रस्ता निर्मनुष्य झाला. त्याचं कारण एकच होतं, ते म्हणजे कालच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दिसून आलाय. अकोल्याच तापमान शनिवारी महाराष्ट्रातील सर्वाधिक 44.3 पर्यंत नोंदविण्यात आलं होतं. तर उन्हापासून संरक्षित राहण्यासाठी सुती कपडे व इतर वस्तूंचा वापर करावा.. अशा सूचना सुद्धा आरोग्य विभागाकडून दिल्या असून 12 ते 4 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये. आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडावे. असं सुद्धा आवाहन अकोल्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
Live Update : नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- उपचारात हलगर्जीपणा केल्याने माहेश्वरीचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांवर ठेवण्यात आला ठपका
- जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या चौकशी समितीच्या अहवालात डॉक्टर दोषी असल्याचे झाले होते निष्पन्न
- अहवालात दोषी डॉक्टरांचे नाव न देण्यात आल्याने दोषी डॉक्टरांना जिल्हा रुग्णालय प्रशासन पाठीशी घालतय का ? हा देखिल प्रश्न
- पोलीसांच्या पुढील कारवाई कडे आता लक्ष